दिल्लीचा निकाल देशाला आदर्श
दिल्लीतील विजय हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या लोकाभिमुख व पारदर्शी कारभाराचा आहे. केवळ कार्यकर्तृत्वाच्या जोरावर सलग तीन वेळा निवडून आलेल्या ह्या आम आदमी पक्षाच्या सरकारने देशाच्या राजकारणाला एक नवी दिशा दिली आहे. गेल्या पाच वर्षांतील कामाच्या बळावर लोकांसमोर जाऊन मते मागण्याचा हा प्रयोग देशातील एकमेवाद्वितीयच म्हणावा लागेल. आजचे राजकारण आर्थिक पाठबळाच्या जोरावर लढले जात आहे. सत्तेतून पैसा व पैशातून पून्हा सत्ता या एकच निकषाकडे झुकत चाललेल्या आजच्या सत्ताकारणाला दिल्लीच्या निकालाने जोरदार चपराक दिली आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार अशा प्रकारचा आर्थिक बाजार करून निवडून आले असतील याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे हा ऐतिहासिक विजय सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामगिरीचा आहे ही काळ्या दगडावरील पांढरी रेख आहे. याबद्दल खरे तर दिल्लीवासीयांचे कौतुकच करायला हवे. दिल्लीतील मतदारांनी दिलेला कौल देशभरातील मतदारांसाठी एक आदर्श आहे. जनतेची कामे करणारे सरकार हवे असेल तर तिथला मतदार राजा जागरूक असावा लागतो. दिल्लीकरांनी आपली जागरूकता, सुज्ञपणा व आपल्या राज्याविषयीची संवेदनशीलता पून्हा एकदा दाखवून दिली आहे. त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन.



Comments
Post a Comment