कायद्याची कडक अमंलबजावणी करा
अंधश्रद्धेपोटी जादूटोणा, अनुचित प्रथा - परंपरा, अघोरी प्रकार आजदेखील अनेक भागांत सुरू आहेत. नरबळी, हत्या किंवा कांगावा झाल्यास असे प्रकार उघडकीस येत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा कडकपणे राबवणे काळाची गरजच होती. या कायद्याचे परिणाम व धाक लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. राज्यातील समाजसुधारक, प्रबोधनकार, कीर्तनकार, कलापथके, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून राज्यातील तळागाळातील भागांत या कायद्याविषयीचा संदेश परिणामकारकरीत्या पोहोचवता येईल व त्यामुळे असे प्रकार नियंत्रणात आणण्यात मदत होईल असे वाटते.

Comments
Post a Comment