काटी गावातील भागीर्थी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
ऐतिहासिक भागीर्थी मंदिरात महाशिवरात्री निमित्त यात्रा
काटी गावाशेजारील भागीरथी मंदिर हा निसर्गाने भरभरून दान दिलेला परिसर. एकीकडे मंदाग्नी पर्वताचा ऐतिहासिक परिसर तर दुसरीकडे ग्रामस्थांची हिरवीगार शेती व मळे. अशा वातावरणात दर महाशिवरात्रीला येथे अनेक दशकांपासून यात्रा भरते. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी ही यात्रा म्हणजे भटकंतीचे हक्काचे ठिकाण. लहानपणी मीदेखील या यात्रेला आवर्जून न चुकता हजेरी लावायचो. ग्रामस्थांच्या पुढाकाराने आता ह्या मंदिराचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. मात्र शासनाच्या पर्यावरण व पुरातत्व खात्याने या भागाचे ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व लक्षात घेता विशेष निधी व सुविधा मंजूर केल्या पाहिजेत जेणेकरुन महाराष्ट्राच्या नकाशावर हा भाग अधिक ठळक अधोरेखित होईल व येथील लोकांना काही प्रमाणात हक्काचा रोजगार व आंनद मिळेल. आज महाशिवरात्री निमित्ताने मंदिराजवळील काटी गावातील तरुणांच्या क्लासिक ग्रुपने भाविकांसाठी जल व शितपेयाची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जोपासली. याच ग्रुपमधील एक तरुण कुमार केतन भरत पाटील यांचे मनोगत अवश्य वाचा..
–------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
यात्रा म्हटलें की लहान मुलांच्या चेहऱयावर आपसूकच हसू येत..आपले आई बाबा आपलयाला एवढी खाऊ घेऊन देणार यातच त्यांचे मन प्रसन्न होऊन जातं..
औचित्य आहे ते.. परंपरागत चालत आलेल्या खास महाशिवरात्री निमित्ताने *काटी* या गावी *भागीरथी मातेच्या* मंदिराजवळ भरणाऱ्या यात्रेच, भागीरथी मातेच्या या मंदिराला पौराणिक विशेष महत्त्व प्राप्त आहे.. मंदिराच्या सभोवतालचा परिसर
पूर्ण डोंगराळ सभोतालची हिरवीगार झाडे , पक्ष्यची किलबिल यात हे मंदिर आणखीन विलोभनीय होऊन जातं.
त्यातच महाशिवरात्री निमित्ताने या मंदिराच्या शेजारीच यात्रेचा अयोजन केलं जातं. छोटी मोठी खाऊची दुकाने असतात..खेळणयांची दुकाने, मंदिरा जवळचा परिसर बालगोपाळणी आणि भक्तनि एकदम प्रसन्ना होऊन जातो.या यात्रेनिमित्त वाडा परिसरातील सर्व भाविक आपल्या बालगोपालसाहित हजेरी लावतात..
त्यातच यावर्षीचा विशेष म्हनजे काटी गावामधला यंग *क्लासिक ब्रदर्स* या ग्रुप च्या माध्यमाने आज महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी थंड पेय तसेच पाणी वाटप या ग्रुप ने ठेवलं होतं.. आणि विशेष म्हणजे भागीरथी देवीचा प्रसाद म्हनून ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांना वाटत होते, त्यांचा उत्साह गगनात मावेनासा वाटत होता,त्यांच्या ग्रुप कडून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविकांची तहान भागतीये यांचं आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून दिसत होता.. *क्लासिक ब्रदर्स* ग्रुप चे सर्व सदस्य प्रमुख्याने
1)दिपक पाटील
2)भावेश पाटील
3)रोहिदास पाटील
4)श्याम जाधव
5)प्रकाश पाटील
6)संदेश पाटील
7)संदीप निपुरते
8)योगेश गायकर
व त्यांचे सर्व सभासद उत्साहाने सहभागी झाले होते. भागीरथी मातेच्या चरणीं पार्थना करेन की तुमच्याकडून असच वर्षनुवरश चांगलं कार्य घडत राहो.. या तुमच्या ग्रुप कडून असच भागीरथी मातेच्या महाशिवरात्री च्या निमीत्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनीची तहान भागवली जावे ही पार्थना.
*(लेखक- केतन भरत पाटील)*













Comments
Post a Comment