बोरिवली नॅशनल पार्कमधील आदिवासी विद्यार्थ्यांना जॉयचा मदतीचा हात
बोरिवली नॅशनल पार्कमधील आदिवासी विद्यार्थ्यांना जॉयचा मदतीचा हात
वैभव पाटील
जॉय ऑफ गिव्हिंग सामाजिक संस्थेच्या वतीने सातत्याने विविध भागांतील गरजूंना मदतीचे उपक्रम राबवण्यात येत आहेत. आजवर हजारो आदिवासी विद्यार्थी, वृद्ध, अनाथ व गरीब लोकांना मदतीचा हात पूढे करून त्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे व सुखाचे क्षण फुलवण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. मुंबई व उपनगरांतील अनेक संवेदनशील लोकांच्या सहभागाने तयार झालेला हा ग्रुप आज निस्वार्थी भावनेने सढळ मदत समाजातील वंचीत लोकांपर्यंत पोहोचवत आहे. याचाच एक भाग म्हणून मागील रविवारी २ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्क येथील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रथम वर्धापनदिन व नववर्षाचे औचित्य साधून प्रत्येकी एक ब्लॅंकेट,प्रत्येकी एक किलो तांदूळ दोन वह्या,पेन-पेन्सिल,कंपासबॉक्स, तेल,साबण,कोलगेट,केक,बिस्किटपुडा,तिळाचा लाडू,चॉकलेट,कचोरी,समोसा इत्यादी शैक्षणिक व दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक वस्तू आणि वाचनीय हसती दुनिया मॅगझीन देण्यात आले. यावेळी ३ जुलै २०१८ अंधेरी रेल्वे ब्रीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचविणारे मोटरमन चंद्रशेखर सावंत, ६३ वेळा रक्तदान केलेले राजेंद्र चंद्रहास व आदिवासी पाड्यात काम करणारे दीपक तावडे यांचा खास सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असूंता डीसोजा,छाया राणे,शीला येरागी,मीना भूतकर,अक्षता राणे,दीपाली डोंगरे,प्रवीण पवार,भूषण मुळे,सुशील नागवेकर,रेणुका उजवणे,निशिकांत,उजवणे, अजय आंबटकर,मनीषा आंबटकर,शैला कदम,सचिन कदम,नीलम माने, मनोज कांबळे,गुरू माने,लक्ष्मी कांबळे,भावना सुर्वे,शीला आव्हाड,विवेकानंद धोंगडे,चंद्रशेखर सावंत,अशोक सावंत,दत्ता रातवडकर,दीपक तावडे, मृणाली,सिया,शर्वरी, कियांश,राधिका आदी सभासदांनी मेहनत घेतली. या आधीदेखील जॉय समूहाच्या वतीने राज्यातील विविध आदिवासी पाडे व वृद्धाश्रम अनेकवेळा मदत पोहचविण्यात आलेली असून आजमितिला या समूहात महाराष्ट्रातील विविध भागातील जवळपास दोनशे सभासद कार्यरत असून वर्षभरात अनेकदा गरीब, गरजू वंचित व आदिवासीना मदत करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले. सभासदांच्या वर्गणीतून व समाजातील दानशूर, संवेदनशील लोकांच्या सहयोगातून राबवण्यात येणारे हे उपक्रम यापुढेदेखील अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय सभासदांनी व्यक्त केला.
वैभव पाटील







Comments
Post a Comment