घोडामैदान दूर नाही



गेली अनेक दशके आयोध्येतील राम मंदिर नेहमीच राजकीय पटलावरील प्राधान्याचा मुद्दा बनला आहे. निवडणुकांमध्ये तर हा विषय अचानक उसळी घेतो. दिल्ली निवडणुकीची धामधूम व बुधवारी पंतप्रधानांनी राम मंदिराबाबत केलेली घोषणा हा 'योग' पून्हा एकदा जुळून आल्याने त्यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या नसत्या तरच नवल होते. बुधवारच्या कॅबिनेटच्या बैठकीत अयोध्येत राम मंदिर बांधण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार श्रीरामजन्मभूमी ट्रस्ट या स्वायत्त ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला व तशी घोषणा पंतप्रधानांनी लोकसभेत केली. दिल्ली विधानसभेत भाजपला विजय मिळवणे सोपे राहिलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या महत्वपूर्ण घोषणेचा भाजपला निवडणुकीत फायदा होईल असा तर्क निराधार नसला तरी राम मंदिर उभारण्याबाबत सरकारने उचललेली पावले नक्कीच सकारात्मक आहेत. आता निवडणूकीत त्याचा कितपत फायदा होतो हे पाहण्यासाठी घोडामैदान फार दूर नाही. 







वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त