कोरोना आणि सरकारी संवेदनशीलता
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोना आणि सरकारी संवेदशीलता
सध्या कोरोना विषाणूबाबत लोकांच्या मनात प्रचंड दहशत व भीती पसरल्याचे चित्र आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतदेखील कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने घराघरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या आजाराची लागण नेमकी कशी व कधी होते याबाबत प्रचंड संभ्रम असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. प्रतिबंधात्मक काळजी हाच एकमेव उपाय यावर असून संसर्ग होऊ नये म्हणून आपली व आपल्या आजूबाजूची स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. परदेशातून या आजाराचे संक्रमण आपल्याकडे झाल्यामुळे कोरोनाबधित देशांतून परतलेल्या प्रवाशांकडून सर्वाधिक धोका जाणवत आहे. एका व्यक्तीस या आजाराची लागण झालेली असल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींना त्याची लागण होण्याची भीती अधिक प्रमाणात आहे. पुण्याच्या एका दाम्पत्यास या आजाराची लागण झाल्यानंतर त्या दाम्पत्यास मुंबईतुन पुण्याला सोडणाऱ्या खाजगी वाहनचालकालादेखील त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा संपर्कात आल्यास इतर व्यक्तींना ही लागण होणे अटळ आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासात, गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा व्यक्तीने प्रवेश केल्यास काय हाहाकार उडेल याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे असे कार्यक्रम व प्रवास शक्यतो टाळायला हवेत. सॅनिटायझर व मास्क वापरल्याने संसर्ग टाळता होतो हा समज दृढ झाल्याने कधी नव्हे इतकी विक्रमी विक्री या वस्तूंची होऊ लागली आहे. मात्र संसर्ग टाळण्यासाठी साबण, रुमाल या साधनांचाही वापर होऊ शकतो ही साधी गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही. यामुळे नाहक या वस्तूंच्या साठेबाजीत व किंमतीत वाढ झाली आहे. उलट कोणताही संबंध नसताना चिकन, मटण सारखे पदार्थ खाल्याने करोना होतो हा भ्रम निर्माण झाल्याने या पदार्थांच्या उत्पादकांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. हा विरोधाभास केवळ गैरसमज व अपप्रचारामुळे होत आहे. यासाठी सोशल माध्यमांना आवर घालण्याची वेळ आली आहे. नको तितका कल्पनाविलास व त्यात प्रसिद्धी वाहिन्यांची कल्पकता यामुळे करोनाबाबत समाजात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या या आजाराबाबतची वस्तूस्थिती पुढीलप्रमाणे आहे. जगभरात आजवर या आजाराचे एकूण १४२५३९ इतके रुग्ण आढळले असुन ५३९३ इतके मृत्यू झालेले आहेत. एकटया चीनमध्ये आजवर ८१,०२१ रुग्ण आढळले असून एकूण ३१९४ मृत्यू झाले आहेत. चीनच्या बाहेर भारतासह श्रीलंका, नेपाळ,जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका,इराण, इटली इत्यादी १३६ देशांनीही या आजाराचे रुग्ण नोंदविले आहेत. भारतात या आजाराचे १११ रुग्ण आढळले असुन त्यापैकी २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, यवतमाळ, कल्याण, नवी मुंबई, रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद आदी ठिकाणी एकूण ३७ रुग्ण आढळुन आले आहेत. शासनाच्या वतीने हया विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना अंमलात आणण्यात येत आहेत. बाधित रुग्णांच्या प्रवासाचा आणि त्यानंतरचा इतिहास माहिती घेऊन निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत त्या निवासी सोसायटीमध्ये आवश्यक पथके स्थापन करुन घरोघर सर्वेक्षण फ्ल्यू सदृश्य आजारांचा शोध सुरु आहे. रुग्ण ज्या कंपनीत काम करतो तेथील संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. निकट सहवासितांपैकी लक्षणे असलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात येते. लक्षणे नसलेल्या निकटवासितांना घरी विलग राहण्याचा सल्ला देण्यात येतो आणि त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. सर्वेक्षण आणि इतर कृतियोजनेचे अंमलबजावणीसाठी आरोग्य, नगरविकास, महसूल या विभागाचा आंतरविभागीय समन्वय राखण्यात येत आहे. १५ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १५८४ विमानांमधील १,८१,९२५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात बाधित भागातून एकुण १०४३ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ७७४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व ६६९ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १०४३ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला फोन करुन शंका निरसन करुन घ्यावे असे आवाहन शासानाच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन (०२० -२६१२७३९४) करण्यात आला असून तो २४ X ७ या कालावधीत कार्यरत आहे. येणारे १५ दिवस राज्यात अत्यंत संवेदनशील असुन नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
सरकारी यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. जिथे सर्वसामान्य माणूस अशा प्रकारच्या संशयीत व्यक्तींपासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असताना सरकारी आरोग्य यंत्रणा या रुग्णांवर जीवाची पर्वा न करता उपचार करण्यात व्यस्त आहेत. यातून सरकारी संवेदनशीलतेचे दर्शन महाराष्ट्राला घडत आहे. केंद्रीय आरोग्य विभागापासून राज्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असून या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी अहोरात्र झटत आहेत. यातून लवकरच मार्ग निघेल व पुन्हा एकदा राज्यातील नागरिक चिंतामुक्त जीवन जगू शकतील अशी आशा आहे. तूर्तास सर्वांनी घाबरून न जाता व्यक्तिगत काळजी घ्यावी व संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. यासाठी आपल्या दिनचर्येत व स्वछता राखण्याच्या बाबतीत आवश्यक बदल स्वीकारावेत. या आजाराबाबत उगाच काळजी न करता जागरूक राहिल्यास निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीवर मात करणे शक्य होईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment