मुंबईकर जुमानेनात


कोरोना विषाणूचा मुंबईला वाढता धोका पाहता सरकारने व उद्योजकांनी तातडीने कडक पावले उचलत अनेक गोष्टींवर निर्बंध आणले आहेत. सभा, मेळावे, बैठका, सामाजिक कार्यक्रम यांवर बंधने आणत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा पर्याय खुला करून देण्याबाबत सुचवले आहे. शाळा, कॉलेज, सिनेमागृहे, मॉल अशी सार्वजनिक रहदारीची ठिकाणेही बंद करण्यात आलेली आहे. एकंदरीत संपूर्ण शहर शट डाऊनच्या मार्गावर आहे असे वातावरण आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबई शहराकडे येणारी गर्दी आटोक्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र उपनगरांतून मुंबईकडे काम धंद्यासाठी दररोज धाव घेणारे चाकरमानी व कामगार या परिस्थितीला स्वीकारायला तयार नाहीत अशीच परिस्थिती सध्या जाणवत आहे. मंगळवारच्या मा मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर बुधवारपासून लोकल प्रवासात गर्दी कमी दिसेल म्हणून घराबाहेर पडलो तर मध्य रेल्वे मार्गावर रोजच्यापेक्षा काहीच वेगळी परिस्थिती नव्हती. ट्रेन अगदी खचाखच भरून धावत असल्याचे चित्र होते. यावरून पोटासाठी धावाधाव करणारे मुंबईकर करोनासारख्या गंभीर आजाराच्या राष्ट्रीय आपत्तीलादेखील जुमानेसे झालेत असे वाटू लागले आहेत. हलायलाही जागा नसणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एकमेकांना खेटून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना या आजाराच्या संसर्गाचे काहीही सोयरसुतक नसावे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त