घाबरू नका.. पण जागरूक राहा


जगावर ओढवलेल्या भयानक अशा कोरोना विषाणूच्या संकटाने सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. देशामधील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून प्रमुख शहरे सुतकी वातावरणात आहेत. वस्तुस्थितीची जाण करून देणारे व प्रतिबंधाचा मार्ग सुकर करून देणारी ही कविता....

घाबरू नका पण..जागरूक राहा

जगभरात साथ आली,
करोनाची सुरुवात झाली,
चीनमध्ये पसरलेल्या,
विषाणूची जात आली ..
जग झाले चिंताग्रस्त,
लाखो लोकांना लागण झाली,
करोनाला दूर ठेवण्या,
कसरत सर्वांची सुरू झाली .. 
एका नंतर एक अन,
त्यांच्यामुळेच अनेक,
संसर्गाने बाधित झाले,
आपल्यातलेच कित्येक ..
चीन, इटली, इराक, अमेरिका अन,
भारतामध्येही मृत्यू घुसला,
करोनापासून बचाव करण्या,
जो तो उपाय शोधू लागला ..
कुणी म्हणते मास्क लावा,
कुणी म्हणते सॅनिटायझर घ्या,
जिकडे तिकडे फक्त अन फक्त,
गो करोना गो करोना ..
माणसाने पसरवलेला विषाणू,
माणसालाच डसू लागलाय,
देशानंतर देश अन,
माणसांमध्येही घुसू लागलाय ..
शहरे पडली ओस अन,
व्यवसाय झाले हवालदिल,
काय करावे सुचत नाही,
व्यवहार झालेत सर्वच सील ..
करोनाला भिऊ नका,
मुकाबला करा जोमाने,
काळजी घ्या स्वतःची अन,
प्रवास करा दमाने ..
हात धुवा स्वच्छ,
हस्तांदोलनही नको,
नमस्काराने भेटा फक्त,
उगा संसर्ग नको ..
सर्दी, खोकला, ताप येता,
उपचारांची कास धरा,
आवश्यक असेल तरच प्रवास,
अन गर्दीची ठिकाणे टाळा ..
खोकला येता रुमाल धरा,
मास्कचा आग्रह नको,
प्रसार रोखा आजाराचा,
उगी अफवा नको ..
अफवा पसरवणे गुन्हा आहे,
ठरू नका लक्ष,
सरकारी सूचनांचे पालन करा,
राहा सदैव दक्ष ..
कार्यक्रम - सोहळे टाळा आता,
काळजी घ्या स्वताची,
दूर राहा इतरांपासून,
लक्षणे दिसता करोनाची ..
करोनाची भीती आता,
समाजातून घालवलीच पाहिजे,
घाबरू नका पण जागरूक रहा,
मनी हेच रुजवले पाहिजे ..
उठा सारे सज्ज होऊ,
मुकाबला करण्या करोनाचा,
बाधा झाली लपवू नका,
आधार घ्या आरोग्य सेवांचा ..
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त