राज्यातील २६ करोना रुग्ण बरे होऊन घरी, बाधित १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही, आज नवीन २८ रुग्ण, एकूण रुग्ण १८१


एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र
सार्वजनिक आरोग्य विभाग

नवीन करोना विषाणू (कोविड -१९)  - सद्यःस्थिती आणि उपाय योजना 
दिनांक २८ मार्च  २०२०
प्रेस नोट


राज्यातील २६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी 
बाधित आढळलेल्या १०४ रुणांमध्ये कोणतेही लक्षण नाही
आज नवीन २८ रुग्णांची नोंद 
राज्यातील एकूण रुग्ण संख्या १८१

आज राज्यात आणखी २८ कोविड १९ रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. इतर ४ रुग्ण पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत.  सध्या बधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. 
  राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे - 
अ.क्र. 
जिल्हा / मनपा
बाधित रुग्ण
मृत्यू
मुंबई
७३
सांगली
२४
पुणे मनपा
१९
पिंपरी चिंचवड मनपा
१२
नागपूर
११
कल्याण - डोबिवली 
नवी मुंबई
१*
ठाणे
यवतमाळ, वसई विरार 
प्रत्येकी  ४
१०
अहमदनगर
        ३
११
सातारा, पनवेल
प्रत्येकी २
१२
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, ,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया
प्रत्येकी १
१३
इतर राज्ये - गुजरात


एकूण
१८१
* मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू
राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.  आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
राज्य नियंत्रण कक्ष
०२०/२६१२७३९४  टोल फ्री क्रमांक १०४

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त