खाजगी डॉक्टरांनी लोकांची गैरसोय टाळावी


कोरोनामुळे शहरी भागांत गल्लीबोळात व ग्रामीण भागात गाव-नाक्यांवर असणारे खाजगी डॉक्टर्स भयभीत झाले आहेत. अशा बहुतांश डॉक्टर्सनी संसर्ग टाळण्यासाठी आपापले दवाखाने बंद केले आहेत. मात्र याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. किरकोळ उपचारांसाठी या दवाखान्यांचा मोठा आधार लोकांना असतो. घराजवळ त्वरित औषधोपचार मिळत असल्याने सकाळ सायंकाळ या खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. करोनाच्या दहशतीमुळे हे दवाखाने बंद झाल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या सर्वत्र संचारबंदी असल्याने लोकांना आजारपणात फार दूरचा दवाखाना वा रुग्णालय गाठणे शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपापले दवाखाने सुरू ठेवून किरकोळ आजारपणात लोकांना सेवा द्यायला हवी. सरकारी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने सदैव हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येते. त्यातच खाजगी दवाखाने बंद झाल्याने या गर्दीत भरच पडत आहे. त्यामुळे खाजगी डॉकटरांनी आपल्यातली माणुसकी जागी ठेवत अशा कठीण प्रसंगी लोकांना आरोग्य सेवा पुरवणे आवश्यक आहे. जेणेकरून सरकारी रुग्णालयांवरील भार हलका होईल. महानगरपालिका व स्थानिक प्रशासनानेदेखील हे खाजगी दवाखाने सुरू ठेवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रसंगी कडक पावले उचलत जाणीवपूर्वक दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉकटरांवर कठोर कारवाई करावी. एकीकडे सरकारी आरोग्य यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र झटत असताना खाजगी डॉक्टरांनीदेखील आपल्यातला डॉकटररुपी देव जागा ठेवत रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेऊन सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे.  


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त