कर्करोगाबाबत जागृती आवश्यक


राज्यात कर्करोग रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आज अस्तित्वात आले आहेत. बदलती जीवनशैली व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण हे अधिक आहे. यामुळे कर्करोगावरील संशोधन व उपचार पद्धती यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कर्करोगाचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे क्लिष्ट ठरत नाही व या आजारातून मुक्त होता येते. वेळेत निदान न झाल्याने व वेळीच उपचार न मिळाल्याने कर्करोगाचे रुग्ण दगावलेल्यांची संख्याही मोठी आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी आढळलेल्या जवळपास ११००० कर्करोग रुग्णांपैकी साडेपाच हजार रुग्ण दगावल्याची आकडेवारी या आजाराची भीषणता दर्शवते. कर्करोगावरील गुंतवणूक वाढवली गेली नाही तर हा आकडा वाढतच जाणार हे स्पष्ट आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये कर्करोगाचा आलेख वाढत जाणे आता थांबले आहे आणि कर्करोगातून मुक्त होऊन जगणाऱ्यांचे प्रमाण गेल्या २५ वर्षात २० टक्क्यांवर पोचले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कर्करोगाचे निदान आणि उपचाराच्या क्षेत्रात झालेल्या प्रमुख सुधारणा हेच आहे. कर्करोगावरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्याचे निदान व उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. तरीदेखील असंसर्गजन्य रोगांचा भविष्यात वाढता धोका पाहता सरकारी पातळीवरून सुरू असलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. कर्करोगाबाबत असलेले गैरसमज दूर होण्यासाठी लोकांमध्ये या गँभीर आजाराबद्दल जागृती येणे गरजेचे आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त