राज्यात करोना निदान करणा-या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२
एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र
सार्वजनिक आरोग्य विभाग
नवीन करोना विषाणू (कोविड -१९) - सद्यःस्थिती आणि उपाय योजना
दिनांक ३१ मार्च २०२०
प्रेस नोट
राज्यात करोना निदान करणा-या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत
राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२
करोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळाचे जाळे विस्तार करण्यात आला असून आय सी एम आरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे -
* मुंबई कार्यक्षेत्रातील मृत्यू
राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३३१ नमुन्यांपैकी ५७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३,९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
Comments
Post a Comment