गांभीर्य ओळखा, हा पोरखेळ नाही
कम्युनिटी संसर्ग अधिक भयावह
कोरोना विषाणूने सध्या महाराष्ट्रात थैमान घातले आहे. या आजाराचे देशामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत जे दिवसांगणिक वाढतच चालले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या तर थांबण्याचे नावच घेत नाहीये. मुंबईतील अनेक भाग विशेषतः झोपडपट्टी क्षेत्र तर पूर्णपणे सील करण्यात आलेले आहेत. लोकांना प्रशासनामार्फत वारंवार आवाहन करुनदेखील घरी थांबायचे सोडून निरनिराळया बहाण्याने लोक अजुनही मोठया प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहेत. संसर्गाने पसरणारा हा विषाणू असल्यामुळे एका व्यक्तीचा संसर्ग इतर अनेक व्यक्तींना होण्याची शक्यता असल्यामुळेच सरकारने राज्यातील पर्यायाने देशातील सर्व जनतेला घरातच राहण्यास बंधनकारक केले आहे जेणेकरुन सर्वसामान्य निरोगी व्यक्ती विषाणूबाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल आणि जगभरात प्रचंड नरसंहार घडवत असलेल्या हया जिवघेण्या विषाणूला राज्यात वेळीच थोपविता येईल. मात्र अनेक अतिउत्साही व अतिआत्मविश्वासू लोकांना अजुनही हा पोरखेळ वाटतोय हीच मोठी शेकांतिका आहे. अनेकजण विविध प्रकारे किरकोळ कारणांनी व खोटया बतावण्या करत बिनबोभाटपणे रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. पोलिसांचे दंडुके, वाहन जप्ती सारखी कारवाई होत असतानादेखील लोक ऐकण्याचे नाव घेत नाहीयेत. पुण्या मुंबईसारख्या शहरी भागांबरोबरच ग्रामीण भागांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कोरोनामुळे उदभवलेल्या हया जागतिक महामारीचा प्रगत राष्ट्रेदेखील घनघोर सामना करत असताना आपल्याला त्याचे गांभिर्य लक्षात येत नसेल तर परिस्थीती सुधारण्याची अपेक्षा ठेवणे गैर आहे. या महामारीपासुन आपल्याला वाचवण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत असताना व देशातील मोठ्या संख्येने जनता त्याला पूर्णतः साथ देत असताना काही महाभाग सामाजिक परिस्थीती बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यांना वेळीच थोपवण्याची गरज आहे. अतिआत्मविश्वासामध्ये हे लोक स्वतःबरोबरच इतरांचा जीवदेखील धोक्यात घालत आहेत. या रोगावर कुठलेही औषध सध्या उपलब्ध नसल्यामुळे जगभरात हजारोंच्या संख्येने दररोज लोक मृत्युमुखी पडत आहेत. महाराष्ट्रात हा आकडा दिवसांगणिक फुगत चाललेला आहे. त्यामुळे हा विषाणू एव्हाना कम्युनिटी मध्ये पसरलेला असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काही बिनकामी डोकी बिनबोभाटपणे मुक्त संचार करत असतील व त्यांना ह्या विषाणूचा संसर्ग झाला तर येणारा काळ किती भयावह असेल याची कल्पनाही करवत नाही. आज आपल्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे या विषाणूचा कम्युनिटी संसर्ग रोखणे. सरकारने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले तर कम्युनिटी मध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जवळपास शून्यावर येऊन थांबते. त्यामुळे नवे पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याची संख्याही दिवसांगणिक कमी होत जाऊन तीदेखील नाहीशी होईल. सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता सध्या सुरू असलेला लॉकडाऊन केंद्र सरकारने दिलेल्या कालमर्यादेत उठवला जाणे मुश्किलच वाटते. मात्र या परिस्थितीतून लवकर बाहेर पडावेसे वाटत असेल तर सरकारी नियम कटाक्षाने पाळायला हवेत. अनावश्यक घराबाहेर पडणे, लोकांच्या संपर्कात येणे टाळायला हवे. शारीरिक व परिसराच्या स्वच्छतेतून संसर्ग टाळता येऊ शकतो. त्यामुळे स्वतःला वारंवार निर्जंतुक करण्याचा प्रयत्न करायला हवा, तोंड, नाक, डोळ्यांद्वारे या विषाणूचा संसर्ग होत असल्यामुळे तोंडावर मास्क वापरण्याची सवय लावून घ्या. भरपूर व व्हिटॅमिनयुक्त आहार सेवन करून स्वतःला फिट ठेवा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. आजचे तुमचे घरी थांबणे उद्या महाराष्ट्राला या कोरोनापासून दुर घेवुन जाण्याचे कारण ठरणार आहे एव्हढे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरू नका पण जागरूकता दाखवा.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment