घाबरू नका पण जागरूक राहा
नमस्कार,
आज संपूर्ण जग कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या सावटाखाली असताना महाराष्ट्रातील जनता सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत ज्या एकीने, धैर्याने व ऊर्जेने या आजाराला दूर पळवण्याचा प्रयत्न करतेय त्यासाठी खरंतर शब्दच नाहीत. हेच धैर्य व संयम येत्या काही दिवसांसाठी आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. नेटानं सुरू असलेली ही लढाई आपण जिंकू व पुन्हा एकदा स्वच्छंदी आयुष्य जगू अन त्यावेळी कोरोना विषाणू आपल्या जीवनात, प्रवासात व देशातदेखील नसेल हा आत्मविश्वास आम्हाला नक्कीच आहे.
करोनाचा हाच प्रवास व सर्वांच्या सुरक्षेचा संदेश आम्ही एका कवितेतून आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. माझ्या या कवितेला आपल्या आवाजाचा साज चढवणारे आमचे कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व सिनेकलावंत-दिग्दर्शक या सर्वांचेच मनःपूर्वक आभार..
(विशेष आभार - श्री प्रतीक शेजोळ व श्री विजय सोनोने, बुलढाणा)
*घाबरू नका पण जागरूक राहा*
वैभव मोहन पाटील

Comments
Post a Comment