माझी आदिशक्‍ती ''माझी पत्‍नी'' - २५ वर्षांचा सुखमय आनंदी प्रवास - भावेश पाटील (भाई मामा)

लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त मामांनी लिहलेला लेख

*माझी आदिशक्‍ती ''माझी पत्‍नी''*
२५ वर्षांचा सुखमय  -आनंदी  प्रवास मी आपणा जवळ  मांडतो

आज 13/05/2020 आमच्‍या लग्‍नाचा २५वा  वाढदिवस. आजच्‍याच दिवशी सन १९९५ मध्‍ये आम्‍ही माझा कौटुंबिक साक्षीने व आपल्या उपस्तितीत   प्रेमविवाह केला. त्‍याची किंमतदेखील मला काही काळ चुकवावी लागली कारण घरून थोडा विरोध होता  मात्र लग्‍नाच्‍या पहिल्‍या दिवसापासुन आम्‍हाला माझी मोठी बहिण पुष्‍पा (बाई) व भावोजींची मोहन पाटील तसेच माझा मोठा भाऊ / मित्र दिलीप याची मोठी साथ लाभली व त्यांनी घरची नाराजी दूर करून जी आजवर कायम आहे. अगदी लग्‍नासाठी आई बाबांची संमती घेण्‍यापासुन ते जमवतायेतील तितके आप्‍तेष्‍ट - नातेवाईक गोळा करुन आमचे लग्‍न लावण्‍यापर्यंत बरेच काही. ब-याच प्रकरणात प्रेमविवाह फार यशस्‍वी होत नाहीत हा आपल्‍या समाजातील असलेला समज आमच्‍या बाबतीत मात्र खरा ठरला नाही. आज आमच्‍या हा २५ वर्षांच्‍या संसारात अनेक चढउतार आले, किंबहुना सर्वसामान्‍य नवराबायकोच्‍या आयुष्‍यात येतात त्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त. मात्र आजही आम्‍ही संसारात व आयुष्‍यात घटट पाय रोवून उभे आहोत व याला कारणीभुत आहे मला आजवर साथ देणारी माझी अर्धांगिनी, माझी आदिशक्‍ती, माझी पत्‍नी 'संगिता'. लग्‍नानंतरच्‍या आयुष्‍यात खूप मोट्या प्रेमाने व कष्‍ट करत आम्‍ही आमचा संसाराचा डोलारा उभा केला. आज सर्व काही ठिक आहे, कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी यांची सर्वांची मजबूत साथ पाठीशी आहे. बहिणी व त्‍यांच्‍या मुलांमध्‍ये मला 'मामा' म्‍हणून जो   मान मिळायला हवा त्‍यापेक्षा कितीतरी जास्‍त मला त्‍यांचेकडून मिळालेय. मात्र या क्षणाला मला लग्‍नानंतरच्‍या त्‍या दिवसांची आज खूप आठवण येतेय. लग्‍नानंतर पहिल्यांदाच आम्ही आमच्‍या गावी न  जाता  सगळ्या नातेवाईकांकडे जाऊन आलो. सोबतीला माझी बहिण 'बाई' असायची. नंतर गणपती सणाला आम्ही गावच्‍या घरी गेलो. माझ्या पत्नीला तेव्‍हा गावं म्हणजे काय ते फक्त पुस्तकातून माहित होते. ऐन  पावसाळ्यात  भिजत  घरी पोहचलो. मग काय एवढा  गोतावळा  बघून  घाबरलीच ती. बाईनी तीला धीर देत हे सगळे आपलेच आहेत, तू मोठी  आहेस, तू त्यांना सांगशील ते ऐकतील असे काहीतरी सांगत तीला धीर दिला. मग आई बरोबर बसून सगळे समजून सांगीतले व पुढील सोपस्‍कारांना सुरवात झाली. आई बाबांनी देखील त्‍यावेळी फार मोठया मनाने समजुतदारपणा दाखवत मुलांच्‍या चुका पोटात घेतल्‍या. तिथपासुन सुरु झालेल्‍या आमच्‍या प्रवासात आम्‍ही कुटुंबामध्‍ये कधी थोरले झालो ते कळलेच नाही. बाबा तर  संगीताला तिला आपल्‍या 3 मुलींमधलीच एक मुलगी मानतात. त्यांचे हे बाप लेकीचे नातं दिवसेंदिवस अधिकच घटट होत आहे. माझ्या बहिणींची मुलं तिच्‍याकडे मामी म्हणून नाही तर आई व गुरु म्हणून तिच्याकडे बघतात. त्या सर्वांशी अगदी आपुलकीने संवाद साधत गरज असेल तिथे योग्य मार्गदर्शन व दिशा देण्‍याचं काम ती करतेय जे निरंतर सुरुच आहे. खरंतर हे सर्व पाहून मला तिचा खूप हेवा वाटतोय व मनोमन सुखावतोदेखील. एवढे सगळे करूनही ती आमच्याकडे कधी दुर्लक्ष करतेय असं आम्‍हाला कधी जाणवलंच नाही. नोकरी, घर, प्रपंच सांभाळून ती सगळ्यांची काळजी घेतेय. माझ्या बाबतीत तर ती माझी आदीशक्ती आहे. मुळात मी खूप अबोल, मला बोलायला विषयाची गरज लागते मात्र ती बोलायला लागली की थांबतच नाही. प्रसंग कोणताही असो सुख व दुःखाच्‍या प्रसंगांतही तीन सर्व काही सांभाळून घेतले आहे. कठीण प्रसंगी तिच्‍याकडे जो संयम व परिस्‍थीती हाताळण्‍याचं जे तंत्र आहे ते अपवादानेच इतर कुणाकडे दिसुन येतं. ही जिदद व ईच्‍छाशक्‍ती तिच्‍याकडं कुठुन येते हे मला आजवर पडलेलं सर्वात मोठं कोड आहे. माझे दोन्‍ही मोठया आजारपणात तीनं एकटीनं दाखवलेला धीर, संयम व केलेली सोबत यामुच मी आज ठिकठाक आहे.ह्या बाबतीत  ती  प्रथम  दिलीप बरोबर बोलायच , भाओजीं  ना सांगायची व नंतर ते कोणाला  सांगायचे ते ठरवायचे ,अलीकडेच तर भर लॉकडाऊनमध्‍ये माझे बिघडलेल्‍या प्रकृतीमधुन तीच्‍या या धीरोदत्‍तपणामुळेच तर मी मरणाच्‍या दारातुन परत आलो. संगिता ही स्वामी भक्त आहे बहुदा स्‍वामींकडूनच तिला मिळालेली ही दैवी शक्‍ती आहे असे मी समजतो.

आज पत्‍नी संगिता, मुलगा अनुप असा आमचा त्रिकाणी परिवार आहे. सोबत कुटुंबाचा मोठा गोतावळा आहे. ज्‍या धीराने व निष्‍ठेने मला आजवर साथ दिली तशीच साथ उर्वरीत आयुष्‍यातदेखील माझी आदिशक्‍ती मला देईल याची खात्री आहे. आज लग्‍नाच्‍या २५व्‍या वाढदिवसानिमित्‍त आयुष्‍याची ही कोरीकरकरीत पाने चाळताना गेल्‍या २५ वर्षांचा प्रवास आपल्या सर्व मित्रंच्या सोबतीने व साक्षीने पाहतो तेव्‍हा एकच प्रश्‍न मनात येतो की 'ही आदीशक्‍ती माझे आयुष्‍यात नसती तर?', ज्‍याचे उत्‍तर माझेकडे आज नाही, कालही नव्‍हते व आयुष्‍यात ते मला सापडूच नये असेदेखील मनोमन वाटते.       तसेच माझ्या आयुष्यात  मित्रांचे  स्थान  खूप वर आहे ते नसते तर कदाचित  माझे आयुष्य  खूप limited असते .त्यांनाही  मी मना पासून धन्यवाद देतो . आपल्या सगळ्यां बद्दल लिहायला  बसलो तर   वह्या  कमी पडतील  एव्हढ्या  आपल्यां  बरोबर  आठवणी  आहेत .पुन्हा कधीतरी  लिहीनच  तूर्तास  थांबतो.

आपला
भावेश (भाई) पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त