एव्हढी गर्दी कशासाठी


गेले काही दिवस सीएसएमटी रेल्‍वे स्‍थानकाशेजारील परिसरात पी डिमेलो रोडवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. हजारो परप्रांतीय या ठिकाणी सकाळपासुन भर उन्‍हामध्‍ये रस्‍त्‍यावर उभे राहुन स्‍टेशनमध्‍ये जाण्‍याच्‍या प्रतिक्षेत थांबताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्‍ये अडकलेले व मुंबईत रोजगार शिल्‍लक न राहिल्‍याने ही गर्दी आता गावाकडे प्रयाण करते आहे असे चित्र आहे. मात्र ही प्रचंड गर्दी खरेतर या लॉकडाऊनमध्‍ये व सध्‍याच्‍या परिस्‍थीतीस अनुकुल नाही. एकीकडे सोशल डिस्‍टंसिंग राखण्‍यासाठी सरकार आटोकाट प्रयत्‍न करत असताना परप्रांतियांची ही गर्दी अनेकांच्‍या जिवावर बेतु शकते. बरे ज्‍या ठिकाणी ही गर्दी मार्गक्रमण करत आहे तिथेदेखील परिस्‍थीती वेगळी नाही. त्‍यामुळे आजाराचा प्रसार वाढल्‍यास त्‍यास जबाबदार कोण हा मोठा प्रश्‍न उपस्थित होईल. परप्रांतीय कामगारांना त्‍यांच्‍या गंतव्‍य ठिकाणी पोहोचवणे गैर नाही मात्र त्‍यासाठी हजारोंनी गर्दी करण्‍याएवढी घाई का हे कळत नाही. लोकांना आपापल्‍या इच्छित स्‍थळी जाण्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने रेल्‍वे सेवा सुरु करण्‍याचे संकेत सरकारने दिले असताना एकाच वेळी होणारी ही गर्दी सोशल डिस्‍टंसींगचे नियम पायदळी तुडवणारी आहे. या गर्दीला आवरण्‍यासाठी पोलिस यंत्रणांना होणारा त्रास तर वेगळाच आहे. दिवसभर या गर्दीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पोलिस तारेवरची कसरत करताना दिसतात. त्‍यामुळे परप्रातियांचा आपापल्‍या गावी जाण्‍यासाठी ठिकठिकाणी सुरु असलेला हा आटापिटा अनाकलनीय असुन तो रोखता येणार नाही का


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई    

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त