हवाहवासा लोकल प्रवास मिस झाल्‍यासारखा वाटतोय

हवाहवासा लोकल प्रवास मिस झाल्‍यासारखा वाटतोय

लोकल ट्रेनमध्ये दररोज उपनगरांमधून मुंबईच्या दिशेने लाखो प्रवाशी नोकरी व्यवसायानिमित्त नियमित प्रवास करतात. मी देखील त्यातलाच एक. मात्र  आज  लॉकडाऊनमुळे सर्वच  बंद आहे. त्‍यामुळे कार्यालयीन वाहनाव्‍दारे सध्‍या हा प्रवास सुरु आहे. घणसोली येथून ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाणे येथे पोहोचून ठाण्याहून सकाळी ९.५४ ची ठाणे - सिएसएमटी जलद लोकल कामावर जाण्यासाठी पकडतो. गेली अनेक वर्षे ह्या लोकलने प्रवास केल्याने सर्व परिचित सहप्रवाशांचा आमचा एक छानसा ग्रुप ह्या लोकलमध्ये तयार झाला आहे. हा प्रवास केवळ वेळ घालवण्यासाठी न करता अनेक वर्षांच्या एकत्रित प्रवासाने एकमेकांशी एक भावनिक ऋणानुबंध सर्व सहकारी प्रवाशी वर्गात तयार होत आहेत. यामुळेच प्रत्येकाची सुखदुःखे एकमेकांसोबत या प्रवासात शेअर केली जातात व त्यात सहभागी होण्याचा प्रयत्नदेखील केला जातो. कुणाच्या घरचा लग्नसमारंभ असेल, पूजा, वाढदिवस वा इतर कौटुंबिक सोहळा असला तरी लोकलप्रवासातील हे हमसफर हमखास हजेरी लावतात व शुभेच्छा देतात. लोकलप्रवासातच दसरा, दिवाळी, गुढीपाडवा इतकेच काय एखाद्याचा वाढदिवस देखील अगदि उत्साहात साजरा केला जातो. मीदेखील सवयीप्रमाणे अशावेळी सन्‍मानमुर्तीला पुस्तक भेट देऊन शुभेच्छा देतो. मात्र सध्‍या सुरु असलेल्‍या हया लॉकडाऊनच्‍या काळात हे सर्वच थांबलेले आहे. लोकलमध्ये निर्माण होणारे हे ऋणानुबंध प्रत्येकाला सौजन्य व परस्परसहकार्याच्या भावनेकडे घेऊन जातात. यामुळेच औट घटकेचा हा हवाहवासा  लोकलप्रवास सध्‍या मात्र खूप मिस झाल्‍यासारखा वाटतो.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त