गावाचं गावपण शोधणारे जुहूगावचे लालाशेठ
लोक पुढारले पण गावे हरवली
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
नवी मुंबई ही पूर्वी खाडीकिनारी वसलेली गावखेड्यांची नगरी होती हे सर्वांना ठाऊकच आहे. इथे अनेक छोटी छोटी गावे स्वतःचे अस्तित्व टिकवून होती ज्यात आगरी कोळी लोकांचा भरणा अधिक होता. शेती हाच प्रमुख व्यवसाय, जोडीला मासेमारी व इतर जोडधंदे होतेच. कालांतराने मुंबईवर पडणारा अतिरिक्त भार कमी व्हावा यासाठी नवी मुंबईचा शोध लावला गेला. सुनियोजित शहरे वसवणारे म्हणून ओळख असलेल्या सिडकोच्या माध्यमातून ही २१व्या शतकातील आधुनिक नगरी वसवली गेली ज्यामध्ये स्थानिकांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या व तिथे आज आलिशान इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. अगदी बेलापूरपासून ते दिघ्यापर्यंत नोडस्वरूपात पसरलेल्या या नवी मुंबईचे मोजमाप पूर्वी बेलापूर, आगरोळी, करावे, दारावे, तुर्भे, वाशीगाव, जुहूगाव, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, चिंचपाडा, दिघा यासारख्या गावांमध्ये व्हायचे. सिडकोने नव्या मुंबईचा विकास करताना स्थानिकांची गरजेपोटी बांधलेली घरे टिकून राहावीत यासाठी या गावातील घरांना अभय दिल्याने आजही ही गावे प्रत्येक नोडमध्ये आपले पारंपरिक अस्तित्व टिकवून आहेत. गावठाणे म्हणून संबोधल्या जाणाऱ्या ह्या सेक्टररहित भागाची अवस्था आज त्यांमध्ये अवाजवी बदल व हस्तक्षेप केला गेल्याने फार बरी नाही ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही या गावांमध्ये असेही काही स्थानिक आहेत ज्यांना अजूनही ती पूर्वीची गावखेड्यांची नवी मुंबई राहून राहून आठवते. आज सेक्टर, नोड, प्लॉट, एफएसआय, कार्पेट, बिल्टअप च्या चक्रव्यूहात अडकलेल्या व दाटीवाटीने उभ्या असलेल्या येथील इमारतींमध्ये घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेले आहे. घरांचे भाव गगनाला गवसणी घालत आहेत. अशा परिस्थिती येथील मूळचे गावकरी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. अशीच एक आसामी म्हणजे जुहूगावचे आमचे दिलदार परममित्र व स्थानिक ग्रामस्थ श्री लालचंद सावळाराम भोईर. लालाशेठ म्हणून सगळ्यांमध्ये प्रसिद्ध असलेले हे व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या सारखेच सर्वसामान्य मात्र इतरांना मदत करण्याचा दिलदार स्वभाव, त्यासाठी प्रसंगी आक्रमकताही अंगी अगदी ठासून भरलेली, उरी प्रचंड महत्वाकांक्षा असल्याने मुळातच निडर वृत्ती या सर्वांमुळे ही व्यक्ती विशेष भावते. माझी त्यांची ओळख खूपच जुनी म्हणजे जवळपास १५ वर्षांपेक्षा अधिक काळाची. आज आमची मैत्री अगदी कौटुंबिक पातळीवरची असून एकमेकांकडचे समारंभ, उत्सव यांना आवर्जून हजेरी लावतो. मी ज्यावेळेस त्यांना ओळखायला लागलो त्यावेळी सुरुवातीला ते भूमिपुत्रांना सिडकोकडून मिळणारा साडेबारा टक्क्यांचा मोबदला मिळवून देणे, इमारतींचा विकास करणे, बांधकामे वगैरे बराच उपद्व्याप ते करायचे. मात्र हे करत असताना इतरांना मदत करण्याचा व सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा त्यांचा स्वभाव अद्याप बदललेला नाही. पत्नी व दोन मुले असा चौकोनी परिवार असलेले लालचंद आपल्या मुलाला उच्चपदावर पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत जे त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढवते.
आजवरच्या कमाईतून त्यांनी कर्जतला निसर्गरम्य अशा ठिकाणी थोडी जागा घेऊन ती व्यावसायिक हेतूने विकसित केली आहे जिथे ते कित्येक दिवस जाऊन रमतात. तिथे भाजीचे मळे पिकवतात, शेती करतात, फळबागेत कष्टाची कामे करतात, खरेतर यातून ते आपल्या मनात आपला जुना गाव जुहूगाव जागवण्याचा व जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात असे मला वाटते. कारण आपल्या जुन्या गावाची आठवण, ती संस्कृती, ओढ, आकलन, इतिहास त्यांच्या मनातून जाता जात नाही. सातत्याने ते आपल्या मनातील त्या आठवणी जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. आज वाशीतील आपल्या गावाशेजारी बांधलेल्या मंदिर परिसरात ते जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, व्यसन मुक्ती केंद्र, वाचनालय, वृद्धांचे वाढदिवस साजरे करणे यासारखे उपक्रम राबवत आहेत जे आजच्या अल्पसंतुष्टी व आपमतलबी जगात फारच दुर्मिळ आहेत.
लोकांना हेवा वाटावा असे जीवन जगत असलेल्या लालचंद याना लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसानंतर नुकताच मागच्या आठवड्यात भेटलो. तेव्हा त्यांनी लॉकडाऊनवूनच्या काळात केलेला प्रयोग पाहून थक्कच झालो. लॉकडावूनच्या तीन महिन्यांच्या काळात त्यांनी आपला अख्खा जुना गावच एका कलाकृतीतून जागवलेला आहे. खाडीकिनारी वसलेली वाशी नगरी नवी मुंबई अस्तित्वात येण्यापूर्वी कशी दिसायची याची हुबेहूब प्रतिकृती त्यांनी एका खाटेवर विनावापराच्या वस्तू वापरून साकारलेली आहे. ही कला त्यांनी मला आवर्जून दाखवली तेव्हा मीदेखील थक्क झालो. वाशीमध्ये आज जिथे सेक्टर उभे आहेत तिथे पूर्वी दिसणारी शेती, गावातील कौलारू घरे, जुनी मैदाने, खाडीपरिसर, मच्छीमारांच्या बोटी, मंदिरे त्यांनी हुबेहूब रेखाटलेला असल्याने पाहणाऱ्या जुन्या नवी मुंबईकरांना नक्कीच आपला गाव आठवेल. कल्पनाशक्ती व वास्तवतेची सांगड घालून उलपब्ध साधनांचा व वेळेचा कसा सदुपयोग करायचा हे आपल्याकडून शिकावे अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांना देऊन मी मोकळा झालो मात्र त्यांची ती कलाकृती काहि माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही आणि त्यातूनच हा लेख लिहिण्याचा मोह आवरला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यावर या आकृतीत काही सुधारणा करून, नवी मुंबईची आणखीही काही जुनी गावखेड्यांची चलचीत्रे लावून नव्या पिढीला ते पाहण्यासाठी व अभ्यासण्यासाठी खुले करून देण्याचा त्यांचा मानस आहे. मनात भक्ती व परोपकार साठवलेला हा माणूस वास्तवात जगणे पसंत करतो त्यामुळे वैचारिक पातळी अगदीच उच्चकोटीची, त्यामुळे साहजिकच मित्रपरिवार व गोतावळादेखील तसाच. त्यामुळे अन्याय व शिस्त याबाबत तडजोड न स्वीकारणाऱ्या लालचंद यांच्याबरोबर कधी कधी तासंतास आमच्या गप्पा रंगतात. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी झालेली आमची भेट त्यांच्या ह्या अनोख्या कलाकृतीने आणखीच 'खास' ठरली एव्हढे मात्र नक्की.

Comments
Post a Comment