बालसंस्कार ग्रुपच्या ऑनलाईन लॉकडाऊन स्पर्धेचा व आंनदवारी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल जाहीर

पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा

बालसंस्कार ग्रुप देवघर व देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्ट यांच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भव्य ऑनलाईन बालसंस्कार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात पाठांतर, गायन, चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा निकाल दिनांक १ जुलै २०२० आषाढी एकादशीच्या दिवशी लागला. यावेळी परीक्षक व आयोजकांनी व्यक्त केलेले मनोगत :-

*आयोजक व परिक्षकांचे मनोगत*

नमस्कार बालमित्रांनो,
संपूर्ण जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटकाळात आपण सर्वांनी अत्यंत धीराने व संयमाने परिस्थितीचा सामना केलात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. या जागतिक संकटामुळेच आपले सालाबादप्रमाणे होणारे निवासी बालसंस्कार शिबीर यंदा आपण घेऊ शकलेलो नाही. कर्म, निसर्ग व नियती याच्यापुढे कुणाचे काहीच चालत नाही. त्यामुळेच माणसामाणसांत संक्रमित होणारा कोरोना विषाणू आज माणसामुळेच माणसाच्या जिवावर उठलाय. आज आपल्यातलेच अनेक बांधव या विषाणूचा मोठ्या जोमाने मुकाबला करत आहेत. मग ते कोरोनाबाधित रुग्ण असतील किंवा आपले डॉकटर, नर्स, पोलीस किंवा सरकारी सेवेतील अधिकारी कर्मचारी असतील, या सर्वांना आपण धन्यवाद द्यायलाच हवेत. त्यांनी ज्या कर्तव्यतत्परतेने आपले काम केले तितक्याच जबाबदारीने आतापर्यंत आपण सरकारी सूचनांचे पालन करून या जीवघेण्या आजाराला आपल्यापासून दूर ठेवलेय हेदेखील नसे थोडके. या महामारीत प्रत्येकजण आपापल्या परीने इतरांसाठी काहीतरी करण्याचा, मदतिचा व योगदानाचा प्रयत्न करतोय. अशा वेळी आपण घेतलेला बालसंस्काराचा वसा तरी कसा सोडायचा! त्यामुळे यंदा जरी आपले निवासी बालसंस्कार शिबीर होऊ शकले नाही तरी तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेल्या देणगीचा वापर करून ऑनलाईन स्पर्धा भरवण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार गायन, पाठांतर, चित्रकला, निबंध लेखन यासारखे विषय घेऊन आपण पहिल्यांदाच ऑनलाईन स्पर्धा घेण्याचा प्रयोग केला. मे महिन्यात आपण ह्या स्पर्धेसाठी आपले व्हिडीओ व लिखाण पाठवण्याचे पहिली ते दहावीच्या वयोगटातील मुलांना आवाहन केले आणि त्याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध वयोगटातील तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांतील विविध भागांतील जवळपास दीडशे मुलांनी यात सहभाग नोंदवला. खरेतर हा इतका मोठा प्रतिसाद आपल्या सर्वांसाठी अनपेक्षितच होता. त्यामुळे सर्व बालस्पर्धकांचे व त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक आभार.

सर्वच मुलांनी पाठवलेले साहित्य अत्यंत सुंदर, मेहनतपूर्ण, आकर्षक व आपापल्या कुवतीनुसार यथायोग्यच होते. पाठांतर व गायकीमध्ये मुलांनी कमालच केली आहे. पसायदान तर मुले अगदी अस्खलितपणे बोलू लागली आहेत याचे विशेष अप्रूप वाटते. लेखन व चित्रकलेतील मुलांची प्रतिभा नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे नाव ठेवायला जागा नाही अशा प्रकारचे योगदान सर्वच मुलांनी या स्पर्धेत दिले.

मात्र स्पर्धा म्हटली की क्रमांक आले, जय पराजय आला. त्यामुळे या सर्व मुलांमधून नंबर काढण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते. वास्तविकता सर्वच मुले यात उजवी आहेत, विजेते आहेत हे आम्ही सुरुवातीलाच सांगू इच्छितो. तरीदेखील काही छोट्यामोठ्या त्रुटी व बारकाव्यांच्या मदतीने आम्ही स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील तीन विजेते व दोन उत्तेजनार्थ क्रमांक निवडलेले आहेत. तरीही इतर स्पर्धकांनी अजिबात खेद वाटू न देता विजेत्यांना शुभेच्छा द्याव्यात व नव्या जोमाने पुढच्या तयारीला लागावे.

शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी ऑनलाईन वर्ग बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्यामुळे अभ्यासाला लागून यंदा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्याचे ध्येया समोर ठेवा, आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असतीलच. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही त्यामुळे आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, घरीच राहा, सुरक्षित राहा ! स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांचे पुन्हा एकदा अभिनंदन, उद्या या स्पर्धेचा निकाल जाहीर होणार असला तरी स्पर्धा इथे संपलेली नाही हे लक्षात असू द्या. आम्हीदेखील तुमची वाट पाहतोय, पुढच्या वर्षीच्या बालसंस्कार शिबिरात.
तर मग नक्की येणार ना !


आयोजक व परीक्षक
*बालसंस्कार ग्रुप देवघर*

स्पर्धेचा निकाल


*आनंदीवारी प्रश्नमंजुषा*

सप्रेम जय हरि, 
दिनांक 13 जून २०२० रोजी आळंदीहून संतश्रेष्‍ठ ज्ञानोबारायांचे प्रस्‍थान झाले. त्‍या दिवसापासुन *आनंदीवारी* या एपवरुन  विचाले प्रश्‍न आपण दररोज संध्‍याकाळी 8.00 वाजता एकूण १० ग्रुपवर पाठवत होतो. *पंढरीच्‍या वारीशी* संबंधित हया *ऑनलाईन प्रश्‍नमंजुषेमध्‍ये* आपल्‍या ग्रुपमधील अनेक जण उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेऊन उत्‍तरे पाठवित होते. त्‍यामुळे या प्रश्‍नमंजूषेचे रुपांतर आपण स्‍पर्धेमध्‍ये केलेले असुन प्रत्‍येक ग्रुपमध्‍ये *अचूक व सर्वप्रथम उत्‍तर देणा-या* व्‍यक्‍तींची निवड आपण केलेली आहे. या व्‍यक्‍तींची व त्‍यांच्‍या ग्रुपची नावे खालीलप्रमाणेः 

*१. श्री कमळाकर नाऊ पाटील सर, देवघर* - बाल संस्‍कार ग्रुप देवघर

*२. श्री मधुकर कान्‍हू पाटील सर,* चिंचघर - बाल संस्‍कार ग्रुप - 2

*३. श्री ह भ प दिनानाथ शिवराम भोईर,* नवी मुंबई - वारकरी गुप नवी मुंबई

*४. सौ अंजली सदानंद कवळे, मालाड, मुंबई* - माऊली ग्रुप आळंदी

*५. सौ निशा राजेंद्र मते आळंदी* - अलंकापूर ग्रुप

*६. श्री ह भ प प्रदिप महाराज पाटील, बोईसर* - ऑनलाईन बाल संस्‍कार ग्रुप, देवघर

*७. सौ. मिनल केशव पाटील, आबिटघर वाडा* - वारकरी साहित्‍य परिषद जिल्‍हा अध्‍यक्ष ग्रुप

*८. सौ. सुप्रिया रमेश मुंढे, परळी* - वैजनाथ भगवान बाबा ग्रुप परळी

*९. सौ. मुंजू प्रमोद कारेमोरे नागपूर* - जय संताजी ग्रुप नागपूर

*१०. सौ. राधाताई नागराज पाटील भोलाणे* - तू माझा सांगाती ग्रुप भोलाणे जळगाव

*वरील सर्व विजेत्‍यांचे मनपूर्वक अभिनंदन.*

आपला प्रतिसाद व हजरबाबीपणाची दखल घेऊन बाल संस्‍कार ग्रुप, देवघर यांच्‍या वतीने आपणास सन्‍मानित करण्‍यात येत असुन सन्‍मानाप्रित्‍यर्थ आपणाला *श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान प्रकाशित सटिप पारायण ज्ञानेश्‍वरीची छापील प्रत आणि एक पवित्र तुळशी माळा* *_सप्रेम भेट_* स्‍वरुपात प्रदान करण्‍यात येत आहे. 

आपले पुनश्‍चः अभिनंदन व आपल्‍या वैचारीक ज्ञानगंगेस मनःपूर्वक शुभेच्‍छा.. 

*बाल संस्‍कार ग्रुप देवघर*



Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा