विजबिलात सवलत द्यावी



लॉकडाऊनमुळे गेल्‍या तीन महिन्‍यांपासुन विदयुत वितरण कंपन्‍यांनी ग्राहकांना मिटर रीडींग न घेता सरासरी बिल आकारण्‍यास सुरुवात केली आहे. गेल्‍या तीन महिन्‍यांपासुन सर्व नागरीक घरीच असल्‍यामुळे विजेचा वापरदेखील प्रचंड वाढलेला आहे. टिव्‍ही, पंखे, एसी व इतर विदयुत उपकरणांचा वापर वाढलेला आहे. त्‍यामुळे विजमिटरवरील रीडींगदेखील नेहमीपेक्षा अधिक असणार हे निश्‍चीत आहे. त्‍यामुळे महावितरण व इतर विदयुत कंपन्‍यांमार्फत जेव्‍हा रिडींगप्रमाणे विजबील आकारणी सुरु होईल तेव्‍हा भरमसाठ बिले ग्राहकांना पाठविली जातील. लॉकडाऊनमध्‍ये सर्व उदयोग व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे चाकरमानी व अनेक छोटेमोठे व्‍यावसायिक घरीच आहेत. अनेकांची रोजंदारी व व्‍यवसायातील मिळकत पूर्णपणे स्‍थगित आहे. अशा अवस्‍थेत वीजबिले भरताना नागरीकांची मोठी अडचण होणार आहे. त्‍यांना दिलासा देण्‍यासाठी विजकंपन्‍यांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. विजबिलामध्‍ये काही प्रमााणात सवलत दिल्‍यास त्‍यांची आर्थिक कोंडी होणार नाही. यामध्‍ये सरकारी हस्‍तक्षेपदेखील ग्राहकांसाठी मोलाचा ठरेल. लॉकडाऊन व कोरोनाने मोठया कोंडित सापडलेल्‍या लोकांना विजकंपन्‍या व सरकारकडून दिलासादायक घोषणेची अपेक्षा आहे.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई   

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त