आरोग्यमंथन पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन संपन्न

आरोग्य योजनांची एकत्रित माहिती पुस्तकाद्वारे उपलब्ध
ई बुकद्वारे जनजागृती

राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्यमंथन ह्या आरोग्यविषयक लेखमालिकेचे पुस्तक स्वरूप, मंगळवार दिनांक ९ जून २०२० रोजी राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ अनूप कुमार यादव भा.प्र.से. व आरोग्य संचालक डॉ साधना तायडे यांच्या शुभहस्ते औपचारिकरित्या सोशल डिस्टंसिंगचे पालन करून प्रकाशित करण्यात आले. आढावा बैठकीनंतर आयोजित छोटेखानी अनावरण कार्यक्रमाप्रसंगी आरोग्य विभागाच्या मुंबई आयुक्तालयातील व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित पुणे राज्य कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील, वित्त संचालक श्री रवींद्र शेळके, अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार, प्रकल्प संचालक श्री दिलीप जाधव भाप्रसे (से.नि.), सहसंचालक डॉ विजय कंदेवाड, डॉ नितीन अंबाडेकर, डॉ पदमजा जोगेवर, श्री संजय पतंगे, श्री महेश बोटले, उपसंचालक आयईसी डॉ कैलास बाविस्कर, सहा संचालक डॉ चव्हाण, डॉ पाडवी, डॉ यादव, डॉ घोलप, कार्य अभियंता श्री सोनावणे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता. आरोग्याच्या बहुतांशी योजनांची व उपक्रमांची माहिती या पुस्तकाद्वारे उपलब्ध होऊ शकणार असल्यामुळे आरोग्य जनजागृतीसाठी याचा चांगला वापर होऊ शकेल. सदर पुस्तक ई बुक स्वरूपात सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच या पुस्तकाची पुढील भागदेखील लवकरच सर्वांसाठी ई बुकद्वारे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ई बुक लवकरच सोशल मीडियाद्वारे उपलब्ध होईल. 
धन्यवाद

देऊनी आरोग्य शिक्षण ! सुज्ञ करू प्रत्येक जण

वैभव पाटील
लेखक




Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त