लॉकडाऊन हा पर्याय नाही तर उपाय
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसला तरी उपाय आहे. आज या आजाराचा प्रसार वेगाने होण्यामागचे कारण स्वैर होणारे जनजीवन आहे. अतिआत्मविश्वासाने अनेक लोक आज आवश्यक प्रतिबंधात्मक काळजी घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुख्यतः बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी या विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता टाळेबंदीचा निर्णय हा नाईलाज आहे. मात्र त्यामुळे बाधित होणाऱ्या नोकरदार, व्यवसायिकांची संख्याही मोठी आहे. किरकोळ विक्रेते व रिक्षा टॅक्सीवाले यासारखे रोज कमावून खाणाऱ्यांची अवस्था गेल्या तीन चार महिन्यांपासून अतिशय दयनीय आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडताना स्वयंशिस्त पाळली तर दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहतील व टाळेबंदीची वेळच येणार नाही. आज पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत चाललेली रुग्णसंख्या संसर्ग थोपवणे हीच प्राथमिकता असून यात लोकांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव हाच टाळेबंदीतून मुक्त होण्याचा मार्ग आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment