संकटात संधी शोधू नका
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोना काळात खाजगी रुग्णालयांनी लोकांची सुरू केलेली लूट थांबवायला हवी. कोरोनविषयी रुग्णांच्या मनात असलेल्या भीतीचा फायदा घेऊन खाजगी रुग्णालये मनमानी पद्धतीने बिले आकारत आहेत. लक्षणे दिसत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने मिळेल त्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले जात आहेत. त्यात खाजगी रुग्णालये या रुग्णांच्या निरनिराळ्या चाचण्या करतात, लसी देतात आणि विविध सर्व्हिसेस दाखवून भरमसाठ बिले रुग्णांच्या हातात देत आहेत. डॉकटर व कर्मचाऱ्यांच्या पीपीई किटच्या नावाखाली हजारो रुपये बिलामध्ये समाविष्ट केले जातात. खाजगी रुग्णालयातील ठराविक खाटा सरकारने प्राधिकृत केलेल्या दराने रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश असताना या नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते. गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना खाजगी रुग्णालयांच्या मनमानीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनासारख्या संकटकाळात संधी शोधणाऱ्या या खाजगी रुग्णालयांनी लोकांची लूट थांबवावी व या अडचणीच्या काळात लोकांना माफक दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून वैद्यकीय सेवाव्रत सुरू ठेवावे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps



Comments
Post a Comment