सरकारी प्रयत्न महत्वाचे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
कोरोनाची लस सर्वसामान्यांना सहजरित्या लवकर उपलब्ध होईल अशी शक्यता सध्या धूसर आहे. लसीच्या चाचण्या, आंतराष्ट्रीय परवानग्या, कँपन्यांमधील चुरस, पुरेशी लसनिर्मिती, वादविवाद, कोर्ट या सर्व जंजाळातून सुटून बाजारात लस उपलब्ध होण्यास बराच अवधी लागणार आहे. कोरोना रुग्ण सध्या विनासायासदेखील बरे होत असल्याने कोरोनाची भीती तोवर बऱ्याच अंशी कमी झालेली असेल. सध्या रेमडेसिवीर, टोसिलिझुम यासारख्या इंजेक्शनांचा काळाबाजार बघितला तर लोकांच्या मनातील भीतीचा फायदा उचलत कोरोनावरील लसीच्या बाबतीतदेखिल हीच परिस्थिती उदभवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सहज, स्वस्त किंवा मोफत लस उपलब्ध होण्यासाठी आगामी काळात सरकारी प्रयत्न फार मोलाची भूमिका बजावणार आहेत.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment