मनाजोगे कॉलेज मिळणे मुश्किल


शाळांना ठराविक गुण देण्याचे अधिकार दिल्याने बोर्डाचे निकाल भरघोस लागून मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण होण्यात नवल नाही. मात्र यामुळे प्रवेशप्रक्रियेत प्रचंड चुरस निर्माण होईल व सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या मनोजोगे कॉलेज मिळणार नाही हेदेखील तितकेच खरे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत झालेली वाढ खुप चिंताजनक असून त्याचे कारण या मोठ्या निकालांमध्येच दडलेले आहे. तब्बल २८ वर्षांनी नवे शिक्षण धोरण नुकतेच केंद्राने जाहीर केलेले आहे. त्यात १०वी, १२वी बोर्डच काढून टाकले असून स्थानिक भाषांच्या अस्मिता जपणारी व कौशल्यधारीत शिक्षण पद्धती अस्तित्वात आणली आहे. मुलांच्या कला गुणांना व त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यास वाव देणाऱ्या ह्या नव्या शिक्षण धोरणाचे सकारात्मक परिणाम आगामी काळात दिसून येतील अशी आशा करू या. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त