अखेर कार्यालयातच मुक्कामी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
मागील बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी १० च्या सुमारास कामावर फोर्ट, मुंबई येथे पोहोचलो. पावसाची रिपरिप सुरूच होती. आदल्या दिवशी मंगळवारी मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस झाल्यामुळे आज पाऊस थोडी उघडीप देईल असे वाटत होते. मात्र दुसरीकडे मुंबईच्या गगनभेदी इमारतींवर आभाळातील ढग उतरल्यासारखे वाटू लागले होते. सकाळपासून रिमझिम बरसणारा पाऊस दुपारपासून धो धो बरसू लागला. क्षणाचीही विश्रांती न घेता पडत असलेल्या पावसाने दुपारनंतर अधिक उग्र रूप धारण केले. प्रचंड वेगाने पडणाऱ्या पावसाला वादळी वाऱ्यांनी अधिकच भयावह बनवले होते. दुपारी चार ते रात्री आठच्या दरम्यान कोसळलेल्या पावसाने मुंबई नगरीची अवस्था न भूतो करून दाणादाण उडवली. मुंबईतील बहुतेक सर्वच रस्ते जलमय होऊन भर रहदारीच्या रस्त्यात दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचले. सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याने असंख्य झाडे रस्त्यारस्त्यावर कोसळली. सायंकाळी कामावरून घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना बाहेर पडणे मुश्किल होऊन गेले. रस्त्यावरून वाहनांनी निघालेल्या लोकांना पावसाचे उग्र रूप व रस्त्यांची दैना पाहून पुन्हा माघारी परतावे लागत होते. पाऊस थांबण्याचे व पाणी ओसरण्याचे चिन्ह अजिबातच दिसत नव्हते. आमच्या कार्यालयात देखील आम्ही जवळपास ७०-८० कर्मचारी अडकून पडलो. रात्री ९ पर्यंतदेखील पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही हे पाहून सर्वच कर्मचारी हतबल झाले होते. सायंकाळी ४ -५ च्या सुमारास लोकलने घरी जाण्यासाठी निघालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना सीएसएमटी स्टेशनवरूनच लोकलसेवा ठप्प झाल्याने पुन्हा कार्यालयाकडे परतावे लागले. काही कर्मचारी तर लोकलमध्येच भायखळ्याच्या जवळपास तीन तास अडकून होते. तेदेखील उशिरा कार्यालयात परतले. अखेर सर्वांसाठी एका महिला बचत गटाच्या माध्यमातून रात्रीच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. साधारण रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस उसंत घेत नसल्याचे पाहून अखेर कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या दिवशी सुरू असणारा पाऊस आजवर मुंबईत कधीही पडल्याचे मी पाहिलेले नव्हते. गिरगाव चौपाटी, नरिमन पॉईंट आदी समुद्रकिनाऱ्याच्या भागांत तर समुद्राचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. दररोजचे फोर्ट ते चर्चगेट हे अंतर दहा मिनिटांत पार पडणाऱ्यांसाठीदेखील त्या दिवशी रस्त्यावरील पाण्यातून पायपीट करत तासभर प्रवास करावा लागत होता. पावसाला आव्हान देत जबरदस्ती आपली वाहने घेऊन घरी निघालेले काही लोक वाहने नादुरुस्त झाल्याने रस्त्यातच वाहने सोडून जाताना दिसत होते. अखेर ती रात्र कार्यालयातच काढून सकाळी घराकडे जाण्यासाठी निघालो. जाताना ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेली मोठमोठी झाडे, बंद पडलेली वाहने, साचलेले पाणी दृष्टीस पडत होते. यावरून आदल्या दिवशी पावसाने केलेली करामतीची कल्पना येत होती. २००५ साली २६ जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसाचा इतिहास आजही आपल्याला आठवतो. मात्र त्यापेक्षाही अधिक जोरकसपणे बरसलेल्या ५ ऑगस्ट बुधवारच्या पावसाने नवा विक्रमी अध्याय लिहिलाय एव्हढे नक्की. असे असले तरी मुंबईचे स्पिरीट काही औरच आहे हे दुसऱ्या दिवशी पूर्ववत धावू लागलेल्या नगरीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. अतिरेकी हल्ला व बॉम्बस्फोटांनंतरदेखील लागलीच स्थिरावलेली मुंबई ह्या पावसाला थोडीच जुमानणार !
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

घणसोली, नवी मुंं
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंं
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment