मुलांना त्यांच्या आवडीच्या खेळात रमवा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
गेल्या चार पाच महिन्यांपासून शाळा, मैदानी खेळ सर्वच बंद असल्यामुळे मुले आपापल्या घरी लॉकडाऊन झालेली आहेत. ऑनलाईन शाळा, क्लास सुरू असल्यामुळे मुले बऱ्यापैकी अभ्यासात गुंतलेली असली तरी घराबाहेर पडता येत नसल्याने कंटाळलेली आहेत. शाळा व स्वच्छंदी जीवन पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येत नसल्यामुळे मुलांनी आता अभ्यासाबरोबरच घरच्या घरी आपल्या आवडीचे छंद व कला जोपासण्याकडे वळावे. चित्रकला, हस्ताक्षर, वाचन, हस्तकला, बुद्धीला चालना देणारे बैठे खेळ, शब्दकोडी, ऑनलाईन स्पर्धा यासोबतच कुटुंबामध्ये रमावे. टीव्ही व मोबाईल मध्ये अधिक वेळ न घालवणे उत्तम. आणखी काही काळ बाहेर कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मुलांना मिळलेल्या या सक्तीच्या सुट्टीत त्यांनी आपले उपजत कलागुण व आवडीचे छंद जोपासणे फायद्याचे ठरेल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment