हे विघ्नहर्ता, संकट हे दूर करा

कोरोनाचे विघ्न दूर करा - गाऱ्हाणे



व्यवसाय हवालदिल, नोकरदार गेलेत हरखून, I
कधी येणार आमुचे, गेले दिवस परतुन, II

कोरोनाची भीती दडलीय, मनामनात आमुच्या

आस लागली आम्हाला, पदस्पर्शाची तुमच्या


कोरोनाने उद्धस्थ केलेत, संसार इथले अनेक

विघ्न कोरोनाचे दूर करा, विणवतो तुम्हा हरएक


सण उत्सवांवर बंधने आली, नातीही झाली सैल

माणुसकीच्या सर्व सीमा, कोरोनाने केल्या सील


विघ्नहर्ता तुम्ही देवा, एव्हढे विघ्न हरा आमुचे

जीवन आमुचे पूर्वीसारखे, करून टाका एकदाचे


काळजी घेऊ आता आम्ही, नाही होणार अतिरेक

मास्क अन सोशल डिस्टन्स, पाळणार आता प्रत्येक


काळजी तुम्हा देवा आमुची, तुम्हीच तारणहार गडे

दूर करा हे संकट कोरोनाचे, कृपा तुमची सगळीकडे


तुमच्‍या आगमनाची, आस आम्‍हा न्‍यारी, I
आपल्‍या येण्‍यानंच आज, काळ आम्‍हा तारी, II

सरकारही हतबल आज, पाहू कुणाच्‍या मुखाकडे, I
करुन टाका सृष्‍टी हिरवी, तुम्‍हीच तारणहार गडे, II

मनुष्यजन्म आला संकटात, काय अपराध झाला, I
मोठे आपले उदर देवा, पापे त्‍यात घाला, II

राजकारण नको आम्‍हा, कंटाळलो या साथीला, I
विघ्‍नहर्ते तुम्‍ही आमुचे, संपवा या विघ्‍नाला II

कुटुंबाच्‍या काळजीने, डोळे ओले झाले रे, I
सुखकर्ता अन दुखहर्ता तू, मस्‍तक आमचे झुकले रे II

वक्रतुण्‍ड गजराजा, किती परिक्षा पाहशिल तू, I
कृपादृष्टी करावी आता, तुझ्या आगमनाने तू  II

बाप्‍पा बाप्‍पा लवकर या, तुमच्‍या लेकरांचे दुख पुसा, I
मखर आमचे सजले पाहा, पण कोरोना तेव्हढा जाईल का, II

सृष्‍टी रुसली आमच्‍यावर, निसर्गचक्र उलटे फिरती, I
चमत्‍काराची आस लागली, कृपादृष्‍टी तुझी कधी, II

प्रत्‍येकाचे दुख वेगळे, सर्वजण समदुखी, I
आयुष्‍याचे गणित दुरवर, चिंता आम्‍हा उदयाची, II

मुक्‍काम तुमचा असे थोडका, प्रश्‍न आमचा किती मोठा, I
एैसी कृपा करा भालचंद्रा, वरदान द्या या सृष्टीला


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त