वित्त अधिकारी श्री संजय पतंगे ठाणे महानगरपालिकेत







आरोग्‍य सेवा आयुक्‍तालयांतर्गत सहसंचालक (अर्थ व प्रशासन) या पदावर जानेवारी २०१९ पासुन कार्यरत असलेले वित्‍त विभागाचे अधिकारी श्री संजय पतंगे सर यांची विनंती बदली शासनाने मान्‍य केल्‍याने ते आज कार्यमुक्‍त झाले. जवळपास दिडेक वर्षे आयुक्‍तालयात काम करणारे पतंगे सर हे अत्‍यंत प्रामाणिक, जबाबदारीचे भान असणारे व कर्तव्‍यनिष्‍ठ अधिकारी होते. त्‍यांचेवर सोपविलेल्‍या जबाबदा-यांना त्‍यांनी सुयोग्‍य पध्‍दतीने न्‍याय दिला. मग वैदयकीय अधिकारी व कर्मचा-यांच्‍या आस्‍थापनाविषक बाबी असो की पदभरतीचे विषय असो. प्रत्‍येक लहानसहान बाबींमध्‍ये त्‍यांनी अगदी झोकुन देऊन काम केले व वरिष्‍ठांना अभिप्रेत असलेले आऊटकम, त्‍यांनी कार्यकुशलता व क्षमतेप्रमाणे देण्‍याचा प्रयत्‍न केला. गेल्‍या अनेक वर्षांपासुन विभागामध्‍ये प्रलंबित असलेली आस्‍थापनााविषयक अनेक प्रकरणे विशेष मोहिमा व पाठपुरावा करुन निकाली काढण्‍यामध्‍ये त्‍यांचे योगदान नाकारता येणार नाही. गेल्‍या पाच सहा महिन्‍यांतील कोविड साथपरिस्‍थीतीतदेखील त्‍यांनी कर्तव्‍यभावनेने अविरतपणे काम केल्‍याचे आम्‍ही पाहिले आहे. जितक्‍या जबाबदारीने त्‍यांनी कर्तव्‍ये पार पाडली तितक्‍याच प्रामाणिकपणे वरिष्‍ठ अधिकारी व सहका-यांशीदेखील सौहार्दपूर्ण व्‍यवहार राखण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला. वित्‍त विभागाचा एक अधिकारी या नात्‍याने, विभागासाठी अत्‍यंत महत्‍वपूर्ण असलेल्‍या आस्‍थापनाविषयक बाबींसाठी विभागाचा स्‍वतंत्र अधिकारी असावा आणि केवळ वित्‍त व लेखाविषयक बाबींची जबाबदारी त्‍यांचेकडे असलेल्‍या पदाकडे असावी असे त्‍यांचे स्‍पष्‍ट मत होते. गेल्‍या चार वर्षांपासुन ते किडणीच्‍या एका गंभीर आजाराने त्रस्‍त असून ठाणे ते मुंबई असा दररोजचा सुमारे चार ते साडेचार तासांचा मोठा प्रवास त्‍यांना असहय होत असल्‍याचे ते सांगतात. त्‍यामुळे ठाणे महानगरपालिकेत मुख्‍य लेखा परिक्षक या पदावर शासनाने त्‍यांची विनंती बदली केली व सदर पदावर रुजू होण्‍यासाठी ते आज आरोग्‍य विभागातुन कार्यमुक्‍त झाले. त्‍यांच्‍यासोबत आम्‍ही केलेली पुण्‍याजवळील लोहगडाची चढाई व सफर आजदेखील माझ्या चांगलीच स्मरणात आहे. दिर्घकालीन आजारपण असतानादेखील त्‍यांनी लोहगड चढताना दाखवलेली चपळाई व उत्‍साह वाखाणण्‍याजोगा होता. आज त्‍यांच्‍या बदलीने विभागात आणखी एका अधिकाऱ्याची उणीव निर्माण झाली आहे मात्र त्‍यांनी आरोग्‍य सेवेत दिलेले योगदान नाकारता येणार नाही. सवयीप्रमाणे त्‍यांना आज माझे आरोग्‍यमंथन हे पुस्‍तक आठवण म्हणून भेट दिले व निरोप घेतला. त्‍यांच्‍या भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्‍छा..


वैभव                 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त