आणखी थोडे थांबा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
जीवनावश्यक वस्तूंसाठी अत्यावश्यक सेवांना कोरोना साथीच्या सुरुवातीपासूनच सूट देण्यात आल्यामुळे लॉकडाऊनचा फार मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर झाला नाही. प्रश्न राहिला तो व्यवसाय व उद्योगधंद्याचा, तर तेदेखील आता टप्प्याटप्प्याने सर्व खुले होण्याच्या मार्गावर आहेत. शाळा व मंदिरे ही ठिकाणेदेखील कोरोनासाठी प्रतिबंधात्मक दक्षता घेऊन उघडता येणे शक्य असले तरी तूर्तास कोरोनावर ठोस औषधोपचार व लस उपलब्ध होईस्तोवर तरी ही ठिकाणे सुरू न करणेच इष्ट ठरेल. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार व सार्वजनिक ठिकाणे एकदम खुली करणे थोडे घातक ठरू शकते. रुग्णसंख्या अचानकपणे झपाट्याने वाढली तर त्याचा मोठा भार सरकारी यंत्रणांवर पडेल व सामाजिक स्वास्थ्यदेखील पुन्हा एकदा कोलमडेल. यामुळे सर्व काही पुन्हा सुरळीत होण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणेच योग्य ठरेल असे मत आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment