मुंबई लोकल सुरू करा
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
सध्या मुंबईकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सरकारने सर्व उद्योगधंदे व आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिल्याने तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास ई पासची अट देखील रद्द केल्याने मोठ्या संख्येने लोक वाहनांसह रस्त्यावर उतरत आहेत. याचा परिणाम वाहतूक कोंडीत होऊन थोड्या अंतरासाठी देखील तासंतास अडकून पडावे लागत आहे. त्यात टोल नाके वाहतूक कोंडीचे सर्वात मोठे केंद्र बनले आहेत. मिशन बिगेन अगेनकडे वाटचाल करताना मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सूरू करणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई व उपनगरातील लाखो लोक ह्या लोकलसेवेचा उपयोग प्रवासासाठी करतात. सध्या सर्वसामान्यांनासाठी ही सेवा बंद असून अत्यावश्यक सेवेतील नोकरदारांसाठीदेखील तासातासाच्या अंतराने लोकल धावत आहे. त्यामुळे साहजिकच याचा मोठा ताण रस्तेवाहतुकीवर पडत आहे. उपनगरांतून पोटापाण्यासाठी मुंबईकडे धाव घेणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोजची ही वाहतूककोंडी वेळ, पैसा, इंधन व आरोग्याचा अपव्यय करणारी ठरत असून मनस्ताप वाढवणारी आहे. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवा लवकरात लवकर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून पूर्ववत करावी.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment