वर्क फ्रॉम होम
वर्क फ्रॉम होम ही लोकांची नव्हे तर काळाची गरज होती व आहे. कोरोना संक्रमण काळात जर घरून काम करण्याचे प्रावधान नसते तर अनेक उद्योगधंदे व छोटेमोठे व्यवसाय आतापर्यंत बंद पडले असते. आयटी क्षेत्रातील अनेक कँपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम पर्याय देण्याच्या विचारात आहेत. कार्यालये, वीज पुरवठा, सार्वजनिक वाहतूक सेवा यांवरील सध्याचा ताण पाहिला तर सरकारी निकषांप्रमाणे सोशल डिस्टन्स राखणे अत्यंत जिकिरीचे आहे. संसर्गजन्य आजारांचा मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक स्थळांवरील गर्दी नक्कीच परवडणारी नाही. पाश्चात्य देशांमध्ये वर्क फ्रॉम होम चा पर्याय केव्हाच अंगिकारला गेलाय. करिअर व कौटुंबिक स्वास्थ्य संतुलित राहावे यासाठी वर्क फ्रॉम होम हा उत्तम प्रयोग आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी घरून काम करण्याचा पर्याय जिथे जिथे शक्य असेल तिथे वापरायला काहीच हरकत नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment