कंगनाचे वर्तन निंदनीय
मुबई व मुंबई पोलिसांबाबत अभिनेत्री कंगना राणावतची बेताल वक्तव्ये अत्यंत निंदनीय व असमर्थनिय आहेत. मुंबईत इतकी वर्षे राहून व आपले करिअर घडवल्यानंतर अचानक असुरक्षितता जाणवू लागल्याचे म्हणणे खाल्लेल्या ताटात छेद करण्यासारखे आहे. अशी वक्तव्ये जाहीरपणे करण्याची हिंमत होतेच कशी? मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे म्हणजे इथल्या व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्यासारखे आहे. मुंबई आज वास्तव्यासाठी सुरक्षित व कामधद्यांचे माहेर समजले जाते. त्यामुळे देशभरातून लोक इथे येऊन आपला उदरनिर्वाह करतात. सिनेसृष्टीतील सर्वच तारक तारकांना मुंबईने पैसा, प्रसिद्धी व नाव सर्व काही दिले. अशी मुंबई अतिरेकी वाटू लागणे म्हणजे द्रोहच म्हणावा लागेल. अशा व्यक्तीला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कंगनाने आपल्या बेजबाबदार वर्तनाबद्दल मुंबईकरांची जाहीर माफी मागावी.

Comments
Post a Comment