वाचन मंदिरे खुली करा

मुंबई महाराष्‍ट्रातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनाला टक्‍कर देत प्रवास, व्‍यापार सर्वच सुरु झाले आहे. हॉटेल्‍स, मॉल्‍स यासारख्‍या गोष्‍टीही सुरु आहेत. मात्र राज्‍यातील वाचनालये अजुन सुरु करण्‍यात आलेली नाहीत. वास्‍ताविक लॉकडाऊनमध्‍ये लोकांना घरी बसुन आलेला क्षीण घालवण्‍यासाठी बुध्‍दीला चालना देणा-या वाचनालयांचा आधार होता. वाचनप्रिय लोकांची रोडावत चाललेली संख्‍या पाहता या ठिकाणी फार गर्दीदेखील होत असल्‍याचे चित्र नाही. पुस्‍तके वगळता येथे कोरोना संसर्ग पसरण्‍याचा धोका नाही. मात्र वृत्‍तपत्रे व कागदांमधून तसा संसर्ग वाढण्‍याचा धोका फार कमीच. वाचनालयांतुन कोरोनापेक्षा ज्ञान अधिक पसरणार आहे. त्‍यामुळे कोरोनाच्‍या नावाखाली ही वाचन मंदिरे फार काळ बंदिस्‍त ठेवणे उचित नाही. 'वाचाल तर वाचाल' ही युक्‍ती आपल्‍याला ज्ञानसंपन्‍नतेकडे घेऊन जाणारी आहे. सुशिक्षित समाजाकडे वाटचाल करणा-या महाराष्‍ट्राला सुसंस्‍कृत बनवण्‍यामागे व वाचनसंस्‍कृती प्रबळ बनवण्‍यासाठी या वाचनालयांचा मोठा हात आहे. त्‍यामुळे अधिक काळ ही वाचन मंदिरे बंद न ठेवता वाचनप्रेमींसाठी ती खुली करणे इष्‍ट ठरेल.        

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त