मास्कची सक्ती हवीच

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज सर्वात मोठा इलाज आहे तो म्हणजे मास्क. या विषाणूचा नाक व तोंडावाटे होणारा संसर्ग टाळण्यासाठी मास्क हा संरक्षक भिंतीचे काम करतो. त्यामुळे आगामी काळात प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. मात्र काही अतिउत्साही व अतिआत्मविश्वास असलेल्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणीही मास्कचा वापर टाळताना दिसत आहेत. राज्यातील सर्वात गर्दीचे शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही तर प्रवेश नाही’, ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादींमध्येदेखील मास्क नसेल तर प्रवास नाकारला जाणार आहे. मास्कची सक्ती जोवर होत नाही तोवर कोरोना प्रसाराला आळा घालणे शक्य होणार नाही. सार्वजनिक वाहतूक सेवा बऱ्याच अंशी पूर्ववत झाली आहे. येत्या काही दिवसांत सर्वसामान्यांसाठी मुंबई उपनगरीय लोकल वाहतूक देखील सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. अशा वेळी मास्कशिवाय प्रवास करणारे प्रवाशी इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे मुंबईबरोबरच उपनगरांतील इतर महानगरपालिकांनीदेखील मास्कचा वापर सर्वत्र बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. खाजगी वाहतुकदारांनी या नियमाचे कटाक्षाने पालन केले तर आजाराचा फैलाव रोखता येऊ शकेल. दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू ठेवायचे असतील तर लोकांनी देखील स्वतःच्या व दुसऱ्यांच्या संरक्षणासाठी मास्कचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात नियमित स्वरूपात करावा. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त