तातडीने नुकसान भरपाई मिळायला हवी

सातत्याने विविध संकटांना तोंड देत असलेल्‍या शेतक-यांना अतिवृष्टीने पुन्हा एकदा मोठा तडाखा दिला आहे. मागील आठवडयात झालेल्‍या अवकाळी वादळी वा-याने शेतक-यांच्‍या पिकांचे मोठया प्रमाणात आर्थीक नुकसान झालेले आहे. काढायला आलेली पिके पावसात नष्‍ट झाल्‍याने डोळयासमोर शेतीची बरबादी शेतक-यांच्‍या नशीबी आली. शेतीवर अवाक्‍याबाहेरील व कर्जे काढुन  खर्च करणारा शेतकरी उभे पिक वाहून गेल्‍याने पार कोलमडला आहे. अशा परिस्‍थीतीत शेतक-यांना तातडीने मदत देण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. काढणीसाठी आलेले भात, सोयाबीन, मका, उस व इतर अनेक पिकांचे मोठी नुकसान झाले आहे. उभी असलेली पिके पुर्णपणे शेतात आडवी झाले. काहीतरी ठिकाणी तर वाहून गेली. त्यामुळे शेतक-यांवर वारंवार येणा-या संकटात आणखी भर पडली आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी विवंचेनत सापडला आहे. कोरानाच्‍या या कठीण काळात आर्थीक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली होती. मात्र तीदेखील पावसाने नेस्‍तनाबूत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीला मिळाले आहे. शेतकरी आज हतबल आहे. त्‍यातच या विषयावरुन सध्‍या राजकीय वातावरण प्रचंड तापू लागलेले आहे. राज्‍य सरकार केंद्राच्‍या मदतीच्‍या प्रतिक्षेत आहे. तर विरोधकांकडून तात्‍काळ नुकसान भरपाई देण्‍यासाठी सरकारला लक्ष्‍य केले जात आहे. अशा परिस्‍थीतीत शेतकरी मात्र भरडला जात असुन ता पार मेटाकुटीला आलेला आहे. आर्थिक गणिते बिघडल्‍याने अस्‍वस्‍थ झालेला शेतकरी सरकारच्‍या मदतीकडे आस लावून बसलेला आहे. त्‍यामुळे नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करुन शेतक-यांना तात्‍काळ आर्थिक मदत देणे अत्‍यंत गरजेचे आहे जेणेकरुन लाखांचा पोशींदा असलेला शेतकरी जगेल.

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त