हॉटेल्स चे खाणे टाळा

अनलॉक करता करता राज्यातील सर्व हॉटेल्स व बार सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे हॉटेलमधल्या जेवणावळ्या व पार्ट्या पुन्हा एकदा जोमाने सुरू झालेल्या आहेत. वास्तविक ज्या लोकांना घरचे जेवण दुर्लभ असते त्यांच्यासाठी हॉटेल्सचा मोठा आसरा असतो. त्यामुळे हॉटेल्स सुरू करण्याचा फायदा नक्कीच लोकांना होणार आहे. मात्र या हॉटेल्समध्ये नीट स्वच्छता राखली गेली नाही तर संसर्गाचा धोकादेखील मोठा होऊ शकतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. मग हॉटेल, टेबल्स, किचन, भांडी यांची स्वच्छता असो की ग्राहकांची आरोग्य तपासणी करणे असो. सर्वच गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे व तशी लक्ष ठेवणारी मोठी यंत्रणा आज पालिका प्रशासनांकडे उपलब्ध नाही. हॉटेल्स मालक केवळ व्यवसायिक दृष्टिकोनातून आपला व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडून ह्या बारीक सारीक गोष्टींवर दुर्लक्ष होणार हे निश्चित आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वच्छता, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे तेही ग्राहकांना सांभाळून छोट्या हॉटेल व्यासायिकांसाठी केवळ अशक्यप्राय बाब आहे. किचन मध्ये वापरले जाणारे साहित्य, भांडी व खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांची स्वच्छता, सुरक्षितता बघायची कुणी हादेखील प्रश्न आहेच. त्यामुळे हॉटेल्स पुन्हा जोराने सुरू झालेली असली तरी छोट्या हॉटेल्समध्ये जाऊन तेथील खाद्यपदार्थांवर मनसोक्त व बिनधास्त ताव मारणे धोक्याचे ठरू शकते एव्हढे ध्यानात असू द्या. त्यामुळे आणखी काही दिवस तरी शक्य असेल तर घरचे खाणेच बरे, बरं का ! 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त