नाट्यगृहे कधी उघडणार

कोरोना काळात बंद असलेली नाट्यगृहे अद्यापि उघडण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक कलाकार व कर्मचारी नाटकाची तिसरी घंटा कधी वाजणार या प्रतीक्षेत आहेत. आधीच अडचणीत असलेला नाट्यव्यवसाय सहा सात महिन्यांपासून बंदच असल्याने हवालदिल आहे. नाटकांमध्ये काही सुप्रसिद्ध टीव्ही कलाकारदेखील सहभागी असले तरी आता टीव्ही मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू झालेले असल्यामुळे हे कलाकार बऱ्यापैकी कार्यव्यस्त झालेले आहेत. मात्र नाट्यसृष्टीशी निगडित बहुतांश कलाकार, सहकलाकार व कर्मचारी हे मध्यमवर्गीय असून नाट्यप्रयोगांवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हा वर्ग नाट्यगृहे उघडण्याकडे डोळे लावून बसलेला आहे. त्याचबरोबर नाटकावर नितांत प्रेम करणारा मोठा दर्शक वर्ग महाराष्ट्रात आहे. नाट्यप्रयोग बंद असल्याने ज्वलंत अभिनयाचा आस्वाद घेऊ इच्छिणाऱ्या नाट्यप्रेमींचा हिरमोड होत आहे. अनलॉक मध्ये अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक काळजी घेऊन खरेतर नाट्यगृहे उघडण्यास काहीच हरकत नाही. नाट्यप्रेमी हा तसा जाणता व शिस्तप्रिय वर्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नाट्यगृह क्षमतेच्या निम्म्या प्रेक्षक वर्गासह आवश्यक दक्षता घेऊन नाट्यप्रयोग सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त