दिवाळी करू साधेपणाने

२०२० हे वर्ष सर्वार्थाने सर्व स्तरांतील लोकांसाठी अत्यंत अडचणीचे ठरले आहे. कोरोनाने जनजीवन ठप्प केल्यानंतर वादळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली व अतोनात नुकसान केले. टाळेबंदीच्या पाच सहा महिन्यांच्या काळात अनेक व्यवसाय कायमचे बसले तर लाखो नोकऱ्यांवरही गदा आली. अशा परिस्थितीत सर्वच हिंदू सण अत्यंत साधेपणाने साजरे केले गेले ही खरे तर सामाजिक गरज तसेच आपणा सर्वांचा नाईलाज होता. सर्वसामान्य लोकांचे अर्थकारण पार बिघडून गेल्याने येणारी दिवाळीदेखिल फार उत्साहाने साजरी होण्यासारखे वातावरण नाही. कोरोनाने आज आपले अनेक आप्त, स्वकीय, मित्र, बांधव हिरावून नेले असून येता काही काळ तरी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी कठीण व धोक्याचा आहे. मास्क, स्वच्छता व सोशल सिस्टंसिग ह्या नियमांचे पालन प्रत्येकाने कटाक्षाने करायला हवे. दिवाळीसारखा आपल्या कौटुंबिक आयुष्यातील मोठा सण यंदा आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक काळजी घेऊन साधेपणाने साजरा करणे हितकारक आहे. गरीब व गरजू लोकांना जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न आपली यंदाची दिवाळी नक्कीच आंनददायी व मनाला समाधान देणारा ठरवेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त