स्त्री पुरुष समानता काळाची गरज

स्त्री ही असहाय, अबला, दुर्बल, कमजोर ह्या प्रतिमा व मानसिकता आता समाजातून पुसायला हव्यात. आज सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्री पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसत आहे. यामुळेच राजकीय व शासकीय दोन्ही स्तरांवर अनेक ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्त्रिया उच्च पदावर विराजमान आहेत. अत्याचार, बलात्कार, मारहाण यासारख्या घटनांमधून स्त्रियांची दुर्बलता प्रकर्षाने पुढे येत असल्यामुळे स्त्रीला खऱ्या अर्थाने शक्तिशाली होण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणाचे धडे गिरवायला हवेत. यासाठी लागणारे प्रशिक्षण व हत्यारे बाळगण्याचे अधिकार तिला मिळायला हवेत. स्त्रीवर बसलेला शारीरिक कमकुवतपणाचा शिक्का पुसून तिला सर्वार्थाने सक्षम बनवले तरच विकृत व पुरुषी अहंकार तिच्या वाट्याला जाणार नाही. स्त्री पुरुष समानता ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त