डॉ मयुरी गेडाम यांची अभियान कार्यालयातून एक्झिट

डॉ मयुरी गेडाम, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक यांनी आज अभियानातुन अनपेक्षित एक्झिट घेतली. साधारण दीड वर्षे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयात एसपीएम म्हणून सेवा बजावलेल्या डॉ गेडाम ह्या एक प्रतिभासंपन्न व हुशार अधिकारी होत्या. अभियानाचा वार्षिक आराखडा बनवणे, त्याची अंमलबजावणी, मार्गदर्शक सूचना व जिल्ह्यांना निधींवाटपासंदर्भातील इतर कामांमध्ये त्यांची चांगली पकड होती. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकारी व सल्लागारांबरोबर समन्वयाची भूमिका त्यांनी उत्तररित्या बजावली. राज्य कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांबरोबर सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राखल्यामुळे त्यांची अभियानातील कारकीर्द यशस्वी ठरली. कोविड कालावधीतदेखील त्यांनी कार्यालयात कर्तव्यनिष्ठेने कोविड निधीच्या सुयोग्य नियोजनात भूमिका वठवली. या कार्यालयात येण्याअगोदर त्या भारतीय नौदलातील वैद्यकीय पथकात उच्चपदस्थ अधिकारी होत्या. त्यांचे पतीदेखील नौदलातील वरिष्ठ अधिकारी आहेत व त्यांच्या विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या बदलीमुळे डॉ मयुरी यांनी मुंबईतील अभियान कार्यालयास रामराम ठोकला. मूळचे नागपूर येथील असलेल्या डॉ मयुरी यांचे सेवानिवृत्त वडीलदेखील आरोग्य विभागात उपसंचालक पदावर होते. इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या डॉ मयुरी यांनी यूपीएससी अंतिम परिक्षादेखील उत्तीर्ण केली होती मात्र वैद्यकीय कारणास्तव त्या मुलाखतीस उपस्थित राहू न शकल्याने त्यांची संधी हुकली असल्याचे समजते. आंध्रमध्ये स्थलांतर झाल्यानंतर त्या ठिकाणीदेखील एखाद्या चांगल्या  आस्थापनेत सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. कामकाजाच्या निमित्ताने आयुक्त कक्षात त्यांचा नियमित संपर्क असल्याने त्यांची कार्यपद्धती व बुद्धिमत्ता जवळून अनुभवता आली. त्यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याची उणीव अभियानास नक्कीच जाणवेल. त्यांच्या भावी करकीर्दीस व निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त