कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार

कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार
स्वच्छतेची कास बाळगूनी अंगी, कोरोनाला मी हरवणार I
मास्क वापरूनी सदा सर्वदा, आजारा ह्या दूर पळवणार II

सुरक्षित अंतराची गुरुकिल्ली, अंगी कायम मी बाळगणार I
गर्दी करणे अन गर्दीत वावरणे, कटाक्षाने मी टाळणार II

परिसर अन घर स्वच्छ ठेवून, नियमित हात मी धुणार I
निरोगी जीवनाची धरलिया कास, नागरिक मी जबाबदार II

स्वच्छता अन आरोग्याचा निकट संबंध आम्हा कधी कळणार I
शासकीय सूचनांचे पालन करेन, सुरक्षित अंतर मी राखणार II

संसर्ग दिसता आजाराचा, त्वरीत घेणार शासकीय उपचार I
कुटुंब अन सामाजिक आरोग्याचा, मीच आहे जबाबदार II

चला घेऊया शपथ आपण, निरोगी महाराष्ट्राचे आम्ही वारसदार I
पुन्हा एकदा नव्या दमाने, कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार II
पुन्हा एकदा नव्या दमाने, कोरोनामुक्त महाराष्ट्र धावणार II

वैभव मोहन पाटील
कक्ष अधिकारी

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा