सक्षम स्थानिक परिवहन सेवा आवश्यक

वाचक संवाद सदरासाठी
परिवहन सेवा हा प्रत्‍येक महानगरपालिकेचा अत्‍यंत प्राधान्‍याचा व जिव्‍हाळयाचा विषय असतो. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभागांना तसेच नजीकच्‍या पालिका हददींना जोडण्‍यासाठी सक्षम परिवहन सेवा उभी करणे महानगरपालिकेचे प्रमुख उददीष्‍ट असते. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कंडोम यासारख्‍या महानगरपालिका परिवहन सेवांच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण असताना पनवेल महानगरपालिका मात्र स्‍थापन होऊन मोठा कालावधी उलटलेला असतानादेखील अदयाप स्‍वतःची वाहतूक सेवा उभारण्‍यासाठी उत्‍सुकता दाखवत नसल्‍याबाबत आश्‍चर्य आहे. पालिका हददीमध्‍ये अनेक गावे, एमआयडीसी क्षेत्र व वस्‍त्‍या असल्‍याने या ठिकाणी परिवहन सेवा ही अत्‍यंत निकडीची बाब आहे. तसेच सिडकोमार्फत उभारण्‍यात येत असलेल्‍या बेलापूर ते पेंधर या ११ किलोमिटरच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील मेट्रो रेल्‍वेमार्गाचे कामाची व कोचची सुरक्षा तपासणी गेल्‍या वर्षीच होणे अपेक्षित होते. मात्र हे कामदेखील अपूर्णावस्‍थेतच असुन रेल्‍वे स्‍थानकांच्‍या विस्‍तारासाठी महानगरपालिकेकडे मागणी करण्‍यात आलेला निधी देण्‍यासदेखील पालिकेने नकार दिलेला आहे. यामुळे तिसरी मुंबई म्‍हणून उदयास येत असलेल्‍या व नवे कोरे विमानतळ हाकेच्‍या अंतरावर  असणा-या पनवेल महानगरपालिकेने मेट्रो, परिवहन सेवा यासारखे विषय प्राधान्‍याने हाती घेऊन नागरीकांना दिलासा दयायला हवा. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त