फटाकेमुक्त व वाचनयुक्त दिवाळी हवी
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
दिवाळी तोंडावर आहे. दरवर्षीचा दिवाळी सण म्हणजे कुटुंबासाठी विशेषतः घरातील बच्चेकम्पनीसाठी आंनद व उत्साहाचा काळ असतो. मात्र यंदाचा दिवाळी सण कोरोनाच्या सावटाखाली आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काळजी तर घ्यावीच लागणार आहे. मुलांनादेखील त्यांच्या ऑनलाइन शिक्षणातून पंधरा दिवसांची दिवाळी सुट्टी मिळाली आहे. त्यामुळे जल्लोषात दिवाळी साजरी करण्यासाठी मुले सज्ज आहेत. दिवाळीत सर्वाधिक मागणी असलेले फटाके यंदा टाळण्याचे आवाहन सर्व स्तरांतून करण्यात आले आहे. आर्थिक मंदी व प्रदूषणाने पसरणारी रोगराई या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळीच साजरी करणे फायद्याचे आहे. त्याऐवजी मुलांना दिवाळी अंक व इतर वाचनीय पुस्तके देऊन वाचनाकडे वळवणे उचित ठरेल. मोबाईल अतिरेकामुळे लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. त्याची सुरुवात या दिवाळीपासून करून मुलांना फटाक्यांऐवजी त्याच पैशातून पुस्तके आणून दिली तर खऱ्या अर्थाने ही दिवाळी सार्थकी लागेल व त्यांना वाचनाचीही गोडी लागेल. वाचनातून ज्ञान व ज्ञानातून व्यवहार कळतो. मुलांना त्याची आवड लहान वयातच लागली तर अभ्यास व दुनियादारीत त्यांना अडचण येणार नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त कराच मात्र मुलांना वाचनाकडेदेखील वळवण्यासाठी दिवाळीत पुस्तकखरेदी करावी. शेवटी म्हणतात ना "वाचाल तर वाचाल".
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment