डीसले सरांच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा

एकीकडे शिक्षण क्षेत्र हे काहीसे दुर्लक्षित होत असल्याचे चित्र असताना सोलापूरचे उपक्रमशील शिक्षक रणजितसिंह डीसले यांनी जागतिक पातळीवरील सर्वोत्तम शिक्षकाचा पुरस्कार पटकावून अवघ्या देशातील शिक्षणक्षेत्राची मान गौरवाने उंचावली आहे. यामागे त्यांची असलेली मेहनत, बुद्धी व कुशाग्रता याला खरेतर तोड नाही. आजवर क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात मोठमोठे पुरस्कार पटकवणारे अनेक आसामी आपल्या देशात आहेत. त्यांचा हार, फुले, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र फार तर काही रक्कम देऊन सत्कार, सन्मान करण्यापलिकडे त्यांच्या कुशाग्रतेचा फार वापर झाल्याचे दृष्टिपथात नाही. कायदे, नियम, कल्पना, धोरण तयार करण्यासारख्या बाबी लोकशाहीत लोकप्रतिनिधिंमार्फत होणे अपेक्षित असतात. यासाठी कुशल, उपक्रमशील, प्रयोगशील लोकप्रतिनिधींची गरज प्रत्येक सभागृहाला असते. डीसले सरांसारख्या व्यक्तींच्या सुपिक बुद्धिमत्तेचा यासाठी वापर करून घेतल्यास त्याचा जनतेला नक्कीच फायदा होईल. त्याच अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रीगणांनी म्हटल्यानुसार आगामी काळात डीसले सरांच्या नाविन्यपूर्ण व उपक्रमशील योजना कशा प्रकारे तळागाळातील विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी कामी आणल्या जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त