ओळ्खपत्रही सक्तीचे हवे

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय परिस्थितीपुरक व रास्तच आहे. गेल्या काही वर्षांपासून सरकारी कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी विविध फॅशनचे कपडे परिधान करत असल्याचे दिसून येत आहे. अगदी जीन्स, टीशर्ट यासारखे कपडे वापरण्याचे प्रमाणदेखील अधिक प्रमाणात दिसून येते. वास्तविक परिस्थिती व सोयीनुसार वस्त्रे घालण्यास कोणतीच अडचण नाही मात्र शासकीय कामकाजात कार्यालयीन वेळेत शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शिस्त व आदर्शवत वर्तन करायला हवे व त्याची सुरुवात नीटनेटक्या कपड्यांनी करायला हवी हे सरकारी म्हणणे योग्यच आहे. आजवर कर्मचाऱ्यांना कोणताही ड्रेस कोड लागू नव्हता त्यामुळे कपडे परिधान करण्यावर बंधन नव्हते. मात्र आता शासन निर्णयाचे पालन करावेच लागणार आहे. त्यामुळे अगदी मंत्रालयापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत कपड्यांच्या बाबतीतील शिस्त पाळावी लागणार आहे. याच पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र परिधान करणेदेखील बंधनकारक करायला हवे असे मत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी नागरिक येत असतात. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांचा परिचय व ओळख नसल्याने भेटी देणाऱ्या लोकांची मोठी अडचण होते. यासाठी कर्मचाऱ्यांची ओळख, नाव, पदनाम माहीत होण्यासाठी गळ्यात घातलेले ओळखपत्र योग्य भूमिका वठवू शकेल व सरकारी कामदेखील अधिक सुलभ, लोकाभिमुख होईल असे वाटते. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त