शहरातील कोरोना संपला की काय?

कोरोनाचा प्रादुर्भाव काही अंशी कमी झालेला असला तरी 'तो' पूर्णपणे संपलेला नाही. मास्‍क व सोशल डिस्‍टंसींग बंधनकारक केलेले असताना अनेक जण या नियमांचे सर्रास उल्‍लंघन करत असल्‍याचे दिसुन येते. नवी मुंबईच्‍या सर्वच बाजारपेठांमधील गर्दी पाहीली तर सोशल डिस्‍टंसींगचे तीन तेरा वाजल्‍याचे पाहायला मिळते. कधी नव्‍हे इतकी गर्दी बाजारात सायंकाळच्‍या वेळेत दिसुन येते. वाहनांची वर्दळदेखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असुन रस्‍त्‍यांवरील वाहनकोंडीदेखील वाढताना दिसत आहे. वाहनचालक व बाजारात फिरणा-या अनेकांच्‍या तोंडावर मास्‍कदेखील दिसुन येत नाहीत. अशा व्‍यक्‍ती खरेतर इतरांसाठी धोकादायक आहेत. एकीकडे शासनाच्‍या वतीने संसर्ग रोखण्‍यासाठी जनजागृती व प्रयत्‍न करण्‍यात येत असताना काही लोकांचा फाजील अतिआत्‍मविश्‍वास कोरोना संसर्गाला प्रोत्‍साहन देणारा आहे. त्‍यामुळे विनामास्‍क फिरणा-या लोकांवरील कारवाई अधिक तिव्र करण्‍याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्‍यांचेकडून आकारण्‍यात येणा-या दंडाची रक्‍कमदेखील दामदुप्‍पट करायला हवी. तसेच बाजारपेठांमधील अनावश्‍यक गर्दी विविध उपाययोजनांव्‍दारे रोखायला हवी. तरच शहरातील कोरोना रुग्‍णांची संख्‍या आटोक्‍यात राहील. मात्र सध्‍याची परिस्‍थीती पाहता 'शहरातील कोरोना संपला की काय' अशी शंका घेण्‍यास ब-यापैकी जागाा निर्माण झाली आहे.  

वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त