समान नागरी कायदा आवश्यक
कुटुंबनियोजनाचे नियम, सरकारी प्रतिबंधात्मक लसी नाकारणारे अनेक दूषित घटक समाजात आहेत. याबाबत अनेक गैरसमज मनात असल्याने व त्याच्या भविष्यातील फायद्यांची जाण नसल्याने उचित प्रबोधनाअभावी त्यांच्याकडून अशा गोष्टींना सपशेल नकार दिला जातो. देशाच्या वाढत चाललेल्या विस्फोटक व भरमसाठ लोकसंख्येचे परिणाम सर्वश्रुत आहेत. त्यामुळे कुटुंबनियोजनाचे नियम हे अधिक कडक करावेच लागतील. ते नियम नाकारणाऱ्या घटकांना कोणत्याही सरकारी योजनांचे लाभार्थी करण्यास अटकाव करणारा कायदा अस्तित्वात येणे काळाची गरज आहे. तीच बाब लसीकरणाच्या बाबतीत लागू पडत असून सामाजिक आरोग्य अबाधित राखायचे असेल संसर्गजन्य आजारांसाठी उपलब्ध होणारी सार्वत्रिक लस सर्व घटकांना बंधनकारक करणे देशहिताचे आहे. अन्यथा लस टोचून न घेणारे लोक इतरांसाठी कर्दनकाळ ठरतील. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींमध्ये सक्तीची बंधने आणावीच लागतील.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment