यांना आवर घाला
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
परवा गोरेगाव येथे कामानिमित्त जाण्यासाठी दादर येथून लोकल पकडली. अंधेरी स्थानकात गाडी येताच तीन चार तृतीयपंथी डब्यात चढले व प्रवाशांकडून पैशांची मागणी करू लागले. त्याच दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरच एका चोरट्याने एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून धूम ठोकली. त्याला पकडण्याच्या नादात तो प्रवाशी लोकलखाली येतायेता वाचला. वास्तविक सध्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकल वाहतूक सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहे. तिकीट काढताना व रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांकडून ओळ्खपत्राची मागणी केली जाते. असे असताना हे भुरटे चोर व इतर घटक रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करतातच कसे हा मोठा प्रश्न पडतो. रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस व सीसीटीव्ही सारख्या यंत्रणा कार्यान्वित असतानादेखील मोठ्या हिंमतीने हे लोक स्थानकांमध्ये घुसतात व आपला कार्यभार साधण्याचा प्रयत्न करतात. रेल्वे डब्यांमध्ये लहान लहान मुलांकडून सर्रास भीक मागितली जाते. अशा मुलांना बालसुधागृहात भरती केले पाहिजे. सध्या रेल्वेमध्ये मर्यादित प्रवेश असल्यामुळे फार गर्दीदेखील नसते. तरीदेखील चोरीसारखे प्रकार करण्याचे धाडस करत असतील तर रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा लोकांवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. त्यांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न अपेक्षित आहेत. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांत विनाकारण फिरणारे लोक , गर्दुल्ले, भिकारी, तृतीयपंथी, संशयित व्यक्ती, फेरीवाले, चोर यांना आळा घालणे गरजेचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment