न्यायासाठी दाद मागणारे भरडू नयेत

सध्‍या विविध राजकीय, सामाजिक संघटनांमार्फत सोशल माध्‍यमांचा अनिर्बंध वापर सुरु आहे. यात तरुणाई आघाडीवर आहे. यामध्‍ये अनेकदा आक्षेपार्ह, सामाजिक वा विशीष्‍ट गटाच्‍या भावना दुखावणा-या, सामाजिक दुही व कलह निर्माण करणा-या, देशविरोधी पोस्‍टचादेखील वापर केला जातो. यावर कुठेतरी नियंत्रण आणण्‍याची गरज निर्माण झाली आहे. त्‍यामुळे सामाजिक वातावरण गढुळ करणा-या पोस्‍टच्‍या निर्मात्‍यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे यात दुमत नाही. मात्र  आंदोलनात सहभाग घेणे हा गुन्‍हा शिक्षेस थेट पात्र ठरवणे संंयुक्‍तीक वाटत नाही. यात तरुण पिढीच्‍या करिअरचा प्रश्‍नदेखील उदभवू शकतो. अन्‍यायाविरुध्‍द आंदोलन, निषेध, उपोषण, धरणे हे घटनेने दिलेले अधिकार आहेत. त्‍यामध्‍ये कायदा मोडणा-यांचे समर्थन करता येणार नाही. मात्र त्‍यात सहभाग घेतला म्‍हणून त्‍याला नागरिकत्‍वाच्‍या इतर सवलती नाकारणे योग्‍य ठरणार नाही. त्‍यामुळे देश व कायदाविरोधी वर्तन करणा-यांना शिक्षा झालीच पाहीजे पण त्‍यात न्‍यायासाठी दाद मागणारे भरडू नयेत असे वाटते.

वैभव मोहन पाटील
घणसाेली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त